इस्लामाबाद - पाकिस्तान संसदेत शुक्रवारी जोरदार राडा झाला. अर्थसंकल्प प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी विशेष सत्र बोलविण्यात आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधीपक्षांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाली. परिस्थिती इतकी बिकट झाली की काही खासदार सभागृहाबाहेर पडले. या गदारोळात एक महिला खासदार जखमी झाल्याची माहिती आहे.
-
تھپڑ ، گالم گلوچ اور نفرت کی سیاست نے پارلیمان کو بھی میدان جنگ بنا دیا۔ افسوس! pic.twitter.com/5sFEbXBo9c
— Naz Baloch (@NazBaloch_) June 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">تھپڑ ، گالم گلوچ اور نفرت کی سیاست نے پارلیمان کو بھی میدان جنگ بنا دیا۔ افسوس! pic.twitter.com/5sFEbXBo9c
— Naz Baloch (@NazBaloch_) June 15, 2021تھپڑ ، گالم گلوچ اور نفرت کی سیاست نے پارلیمان کو بھی میدان جنگ بنا دیا۔ افسوس! pic.twitter.com/5sFEbXBo9c
— Naz Baloch (@NazBaloch_) June 15, 2021
शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने आपला तिसरा अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी हा अर्थसंकल्प पूर्णपणे नाकारला. मंगळवारी यावर चर्चा होणार होती. मात्र, संसदेत गोंधळ उडाल्याने चर्चा तर दुरच प्रस्तावही मांडण्यात आला नाही.
इम्रान खान यांच्या सरकारने नुकतेच तीन तीन वर्षे पूर्ण केली आहेत. तर शौकत हे त्यांचे चौथे अर्थमंत्री आहेत. अर्थमंत्री शौकत तारीन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला होता. शौकत आणि त्याचा भाऊ जहांगीर तारीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. शौकत आणि जहांगीर इम्रानच्या जवळ असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
संसदेत भलतीच परिस्थिती निर्माण झाली. काही वेळातच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील खासदार समोरासमोर आले. अर्थसंकल्पच्या प्रती एकमेकांवर फेकल्या गेल्या. यानंतर, टेबलावर ठेवलेल्या वस्तूंनी एकमेकांवर हल्ला केला. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.
खासदारांची मारहाण, तर वरिष्ठ नेते हसताय...
या गदारोळात इम्रानची पार्टी पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफच्या महिला खासदार मलेका बुखारी जखमी झाल्या. इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार अली अवन यांनी उघडपणे शिवीगाळ केली. या संपूर्ण घटनेदरम्यान पंतप्रधानांसह सत्ताधारी पक्षाचे सर्व नेते हसताना दिसले.