इस्लामाबाद - भुकेने कंगाल झालेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानावर आपले अधिकृत निवासस्थान किरायाने देण्याची वेळ आली आहे. इम्रान खान यांचे निवासस्थान हे इस्लामाबादमध्ये असून किरायाने देण्यात येणार आहे. आपला शेजारी देश पाकिस्तान कोरोनाच्या पूर्वीपासूनच मंदीचा सामना करत होता. त्यात कोरोनाने आणखी भर टाकली. सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात आहे. गरीबी ही पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या बनली असून पाकिस्तान सरकार इतर देशांकडून कर्ज घेत आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये महागाईने डोकं वर काढलं आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानचे नागरिक त्रस्त झाले आहेत.
ऑगस्ट 2019 मध्ये सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने पंतप्रधानांच्या घराचे विद्यापीठात रूपांतर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी आपले निवासस्थान खाली केले होते. मात्र, आता सरकारने आपला निर्णय बदलला असून विद्यापीठात रूपांतरित न करता निवासस्थान किरायाने देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक माध्यमांच्या मते, सरकार निवासस्थान हे शैक्षणिक संस्थांऐवजी आता सांस्कृतिक, फॅशन आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देईल. फेडरल कॅबिनेट बैठक घेणार असून पीएम इमारतीतून महसूल मिळवण्याच्या मार्गांवर चर्चा करणार आहे.
पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट -
इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जाहीर केले होते की, सरकारकडे लोककल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी पैसा नाही. पंतप्रधान बानी गाला निवासस्थानी राहत आहेत आणि पंतप्रधान कार्यालय वापरतात. इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानची अर्थव्यवस्था 19 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी त्यांनी सरकारी खर्चातही कपात केली होती.
पंतप्रधान इम्रान खान ट्रोल -
यापूर्वी इम्रान खान यांचे एक भीक मागतानाचे ट्रोलींग छायाचित्र प्रंचड व्हायरल झाले होते. गल सर्च इंजिनवर भिकारी सर्च केले असता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे एक छायाचित्र येत होते. या छायाचित्रामध्ये इमरान खान हातात वाडगं घेऊन बसलेले दिसत होते. हा एडिट केलेला फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जेव्हा एखादा शब्द अनेकवेळा सर्च होतो. तेव्हा गुगल सर्च इंजिन त्या शब्दाचा लोकप्रिय श्रेणीमध्ये समावेश करतो.
हेही वाचा - हॉटेलचे पैसे वाचवण्यासाठी इम्रान खान राजदुताच्या घरी राहणार?
हेही वाचा - महागाईने पाकिस्तानी नागरिक बेहाल; 100 रुपये किलोने मिळतेय साखर