ETV Bharat / international

कुलभुषण जाधव यांच्या मृत्यूदंड शिक्षेचा पाकिस्तान करणार पुर्नविचार; संसदीय समितीकडून मंजुरी - कुलभूषण जाधव न्यूज

कुलभुषण जाधव यांच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे विधेयक हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी असल्याचे पाकिस्तानचे कायदा आणि न्याय मंत्री फरोघ नसीम यांनी संसदेत सांगितले. जर संसदेने हे विधेयक संमत केले नाही, तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्बंधाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नसीम यांनी दिला.

कुलभुषण जाधव
कुलभुषण जाधव
author img

By

Published : Oct 22, 2020, 1:20 PM IST

इस्लामाबाद- भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी कुलभुषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तान अखेर पुनर्विचार करणार आहे. तुरुंगात कैद असलेल्या कुलभुषण यांच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा, असा प्रस्ताव पाकिस्तान सरकारने सादर केलेला प्रस्ताव संसदीय समितीने मंजूर केला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानुसार कुलभुषण यांना सुनावलेल्या शिक्षेचे पालन करणे पाकिस्तानला बंधनकारक आहे.

कुलभुषण जाधव यांच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे विधेयक हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी असल्याचे पाकिस्तानचे कायदा आणि न्याय मंत्री फरोघ नसीम यांनी संसदेत सांगितले. जर संसदेने हे विधेयक संमत केले नाही, तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्बंधाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नसीम यांनी दिला. कुलभुषण यांच्या मृत्यूदंडाचा पुनर्विचार करणाऱ्या विधेयकाला पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि जमियात उलेमा-इ-इस्लामने विरोध केला आहे.

कुलभुषण जाधव (वय ५५) यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेर ठरवून एप्रिल २०१७ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेवर भारताने आक्षेप घेत आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. कुलभुषण यांना वकील देण्याची पाकिस्तानने परवानगी नाकारल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्हटले होते. या न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये कुलभुषण जाधव यांना सुनावलेल्या मृत्यूदंडाचा पुनर्विचार आणि पुनरावलोकन करावे, असा निकाल दिला होता. तसेच कोणतीही दिरंगाई न करता कुलभुषण यांना वकील देण्याची परवानगी द्यावे, असे न्यायालयाने पाकिस्तानला निर्देश दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.