इस्लामाबाद - पाकिस्तान सरकारने शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या 551 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतीय शिखांना आमंत्रण पाठवले आहे.
भारतीय शीख संगतच्या माध्यमातून आगाऊ पाठविलेल्या निमंत्रणाच्या तपशीलानुसार, कोविड -19 च्या अनिवार्य असलेल्या चाचणीनंतर भाविकांना पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी आणि राहण्यासाठी पाच दिवसांचा व्हिसा देण्यात येणार आहे. गुरु नानक गुरुपर्व म्हणून ओळखल्या जाणार्या तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून ननकाना साहिब येथे होणार आहे.
'बाबा गुरू नानक देव यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना कोविड -19 चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवणे आवश्यक आहे. त्यांच्या संपूर्ण मुक्कामादरम्यान सर्व कोविड -19 एसओपीचे (आदर्श नियमावली) पालन करावे लागेल,' असे वक्फ प्रॉपर्टी बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
याखेरीज देशाच्या वक्फ बोर्ड आणि पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीनेही शिरोमणी कमिटी ऑफ इंडियासह इतर अनेक शीख संस्थांना नियमितपणे निमंत्रणे पाठवली आहेत. सध्या सुरू असलेल्या कोविड -19च्या प्रादुर्भावामुळे भारतीय शिखांना कोणत्याही मुदतवाढीशिवाय मर्यादित काळासाठी पाकिस्तानमध्ये राहू दिले जाईल.
'कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्या यात्रेकरूंना काही नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. मात्र, प्रवास करणाऱ्या भारतीय शीख यात्रेकरूंच्या संख्येवर कोणताही नवीन निर्बंध लागू होणार नाही,' असे पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुख सरदार सतवंत सिंग म्हणाले.
हेही वाचा - मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 'भीती'च्या अस्त्राचा वापर
भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय करारानुसार, तीन हजार भारतीय शीख यात्रेकरूंना गुरदास सोहळ्यासाठी पाकिस्तानात जाण्याची परवानगी विशेष परवानगी देण्यात येणार आहे.
या वेळी, यात्रेकरूंना ननकाना साहिबपर्यंतच येऊ दिले जाणार आहे. याआधी त्यांना लाहोरमधील अनेक गुरुद्वारा, ननकाना साहिब, हसन अब्दाल, करतारपुरा, रोहरी साहिब आणि फारूकबाद येथे जाण्यासाठी त्यांना दहा दिवसांच्या व्हिसाचा पर्याय देण्यात आला होता. यामुळे प्रथमच यात्रेकरूंना लाहोरमध्ये राहण्याचा किंवा खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध राहणार नाही.
'भारतीय यात्रेकरूंचे 27 नोव्हेंबरला वाघा सीमेवरील स्वागत होईल, तेथून ते खास बस सेवेद्वारे ते ननकाना साहिबला जातील. यात्रेकरू ननकाना साहिबच्या विविध गुरुद्वारांना भेट देऊन नगर कीर्तनात सहभागी होऊ शकतात.' असे सतवंत सिंग म्हणाले.
वृत्तानुसार, भारतातील शिरोमणी समितीसह काही शीख संस्थांनी भारत सरकारला गुरु नानक जयंतीसाठी करतारपूर कॉरिडॉर सुरू करण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी देशात धार्मिक पर्यटनाला चालना द्यायची आहे. मात्र, या संदर्भात भारत सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
हेही वाचा - आफ्रिकेच्या माऊंट किलिमांजारोवर पसरली आग, 500 स्वयंसेवकांची झुंज