काबुल - अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या विदेशी नागरिकांची सुटका तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे.
काबुल विमानतळावर गुरुवारी सायंकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. पहिला बॉम्बस्फोट विमानतळाच्या आत धावपट्टीजवळ झाला. आत्मघातकी हल्लेखोर लोकांच्या गर्दीत शिरला होता. तर दुसरा स्फोट हॉटेल बॅरनबाहेर झाला. हॉटेल बॅरन हे विमानतळाजवळ असून ब्रिटनचे सैनिक तेथे मुक्कामाला होते. बॉम्बस्फोट झाल्यानंतर विमानतळाबाहेर प्रचंड गोंधळ झाला होता.
हेही वाचा-काबुल विमानतळावरील बॉम्बस्फोटातून दिसले अमेरिकेसह तालिबानच्या सुरक्षा दलाचे अपयश
काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी आणि एका बंदुकधाऱ्याने विमानतळाबाहेर जमलेल्या निर्वासितांवर हल्ला केला होता. या स्फोटात 60 अफगाण नागरिकांचे आणि 13 अमेरिकन सैनिकांचे प्राण गेले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा 100 हून अधिक असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील निर्वासित रोज मोठ्या प्रमाणावर विमानतळाच्या प्रवेशद्वारावर गोळा होत आहेत. दोन्ही स्फोट हे विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच झाले. हा हल्ला अमेरिकन नागरिकांची आणि इतरांची अफगाणिस्तानातून सुटका करण्यापासून आम्हाला थांबवू शकत नाही, असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटले.
तालिबान-इसिस संबंधाचे पुरावे नाही - बायडेन
काबुल विमानतळावरील हल्ला इस्लामिक स्टेट आणि तालिबानने संगनमताने केल्याचे पुरावे अजून तरी आपल्याकडे नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
हेही वाचा-भारत-चीन यांच्यात चर्चेची 13 वी फेरी लवकरच, हॉट स्प्रिंगवर होणार चर्चा
संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून निषेध -
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी काबुलमधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अफगाणिस्तानातील अनिश्चित स्थिती या हल्ल्यामुळे अधोरेखित झाली आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले.
अफगाणिस्तानात गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर आज पुन्हा निर्वासन उड्डाणे तातडीने सुरू झाली आहेत. आज अमेरिकन सैन्यांच्या विमानांनी निर्वासितांना घेऊन उड्डाने भरली. गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी आणि एका बंदुकधाऱ्याने विमानतळाबाहेर जमलेल्या निर्वासितांवर हल्ला केला होता. या स्फोटात 95 अफगाण नागरिकांचे आणि 13 अमेरिकन सैनिकांचे प्राण गेले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी ISIS या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या घटनेचा अमेरिकेने निषेध व्यक्त केला आहे.
अमेरिकेने दहशतवादी संघटनेला दिला इशारा-
विमानतळावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन पत्रकार परिषदेला संबोधित करताना भावनिक झाले. दहशतवाद्यांना या कृत्याची किंमत मोजावी लागेल, असे त्यांनी म्हटले. 'हा रक्तपात करून अमेरिकेला निर्वासन मोहीम पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही अफगाणिस्तानधील प्रत्येक अमेरिकन नागरिकाची सुटका करू. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यात येईल आणि त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दहशतवाद्यांना दिला.
सैन्य माघारी घेण्याचे बायडेन यांच्याकडून समर्थन
अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवला आहे. तब्बल दोन दशकानंतर त्यांच्या हाती सत्ता आली असून देशात अराजकता पसरली आहे. तालिबान्याच्या राजवटीतून आपली सुटका करण्यासाठी नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितील बायडेन यांना जबाबदार धरण्यात येत आहे. अमेरिकेने जर सैन्य माघारीची प्रक्रियेला वेग दिला नसता. तर तालिबानच्या हाती अफगाण गेले नसते, असे म्हटलं जात आहे. मात्र, बायडेन आपल्या निर्णयावर ठाम आहेत. 20 वर्ष थांबून जर काहीच फरक पडला नाही. तर आणखी काही दिवस थांबून काय होणार होते. अफगाण सैनिकच त्यांच्या देशासाठी लढण्यास तयार नाहीत. तर अमेरिकन सैन्यांना तिथे लढण्यासाठी का पाठवावं. माझ्या सैन्य माघारीच्या निर्णयाची इतिहासात तर्कसंगत, विवेकी आणि योग्य म्हणून नोंद होईल, असे बायडेन यांनी म्हटलं. अमेरिकेने निषेध व्यक्त केला आहे. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यात येईल आणि त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दशतवाद्यांना दिला आहे.
अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अजूनही सुरुच राहिल. अफगाणिस्तान असलेल्या अमेरिकन नागरिकांची आम्ही सुटका करू. आमचे मिशन सुरूच राहणार आहे. गरज पडल्यास आणखी सैन्य अफगाणिस्तानात पाठवण्यात येईल, असे बायडेन म्हणाले.
अलर्ट जारी करूनही झाला बॉम्बस्फोट
अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. काबुल विमानतळावर होणारी गर्दी पाहता दहशतवादी हल्ल्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. जेल तोडल्यानंतर बाहेर पडलेले अफगाणिस्तानच्या आयएसआयएसचे दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.