काठमांडू - नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना लोकप्रतिनिधी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यात अपयश मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पद गमाविले आहे. सीपएन प्रणित ((माओसिस्ट सेंटर)) पुष्पकम दहार प्राचंद यांनी पाठिंबा काढल्याने ओली सरकार हे अल्पमतात आले होते.
बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपदी विद्यादेवी भंडारी यांच्या आदेशाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान ओली यांना खालच्या सभागृहात केवळ ९३ मते मिळाली आहेत. ओली यांना २७५ सदस्यांच्या सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी १३६ मते मिळविणे अपेक्षित होते. नेपाळच्या घटनेप्रमाणे ओली यांनी बहुमत गमाविल्यामुळे त्यांचे पंतप्रधान पद संपुष्टात आले आहे.
हेही वाचा-सू मोटो सुनावणीत तांत्रिक अडचणी; सर्वोच्च न्यायालय १३ मे रोजी घेणार सुनावणी
पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी ओली यांनी मार्ग खुला करावा
- सभागृहात २३२ लोकप्रतिनिधी सहभागी होते.
- नेपाळ काँग्रेसकडे ६१ तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळकडे (माओसिस्ट सेंटर) ४९ मते आहेत. या दोन्ही विरोधी पक्षांनी ओली यांच्या विश्वासदर्शक ठराविरोधात मतदान केले.
- सीपीएनचे वरिष्ठ नेते गणेश शाह यांनी ओली यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी ओली यांनी मार्ग खुला करावा, असे शाह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ओली हे चीनची तळी उचलण्यामुळे नेपाळमध्येही टीकेचे धनी ठरले होते.
हेही वाचा-दिल्ली: लसीकरण होऊनही सर्जनचा मृत्यू; रुग्णालयातील ८० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग