नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. आज नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन समारंभात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी कर्तारपूर कॉरिडॉर पूर्ण केल्यामुळे मोदींचे कौतूक केले आहे.
-
Navjot Singh Sidhu at inaugural ceremony of #KartarpurCorridor in Pakistan: I am thanking Modi ji also, it doesn't matter if we have political differences,doesn't matter if my life is dedicated to Gandhi family, I am sending a Munnabhai MBBS style hug to you Modi sahab for this https://t.co/VqQQduVFaL pic.twitter.com/3Rz0lUf2rW
— ANI (@ANI) November 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Navjot Singh Sidhu at inaugural ceremony of #KartarpurCorridor in Pakistan: I am thanking Modi ji also, it doesn't matter if we have political differences,doesn't matter if my life is dedicated to Gandhi family, I am sending a Munnabhai MBBS style hug to you Modi sahab for this https://t.co/VqQQduVFaL pic.twitter.com/3Rz0lUf2rW
— ANI (@ANI) November 9, 2019Navjot Singh Sidhu at inaugural ceremony of #KartarpurCorridor in Pakistan: I am thanking Modi ji also, it doesn't matter if we have political differences,doesn't matter if my life is dedicated to Gandhi family, I am sending a Munnabhai MBBS style hug to you Modi sahab for this https://t.co/VqQQduVFaL pic.twitter.com/3Rz0lUf2rW
— ANI (@ANI) November 9, 2019
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले. कर्तारपूर कॉरीडॉर पूर्ण करण्यामध्ये इम्रान खान यांनी म्हत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचबरोबर मी मोदींचाही आभारी आहे. जरी आमच्या दरम्यान राजकीय मतभेद असले, तरी मी मोदींना मुन्नाभाई एमबीबीएस स्टाईलने येथून मिठी मारतो, असे सिद्धू म्हणाले आहेत.
पाकिस्ताने या उद्घाटन समांरभासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण दिले होते. त्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना परवानगी मागितली होती.
यापुर्वीही गेले होते सिद्धू पाकिस्तानात-
इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योत सिंग सिद्धू यांनी उपस्थिती लावली होती. तिथे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे फार मोठा गदारोळ माजला होता. भाजपसह इतर अनेक पक्षांनी सिद्धूवर टीका केली होती.