ETV Bharat / international

75व्या वर्धापन दिनाच्या दिवशी उत्तर कोरियाचे भव्य शक्तीप्रदर्शन - उत्तर कोरिया सत्ताधारी वर्धापन दिन

उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाने कोरोनाच्या धोक्यातही आपला ७५वर्धापन दिन साजरा केला. किम II संग आणि किम जोंग II यांच्या पुतळ्यांना फुलांनी सजवण्यात आले होते. नागरिकांनी मास्क लावून या कार्यक्रमाला गर्दी केली होती.

North Korea
उत्तर कोरिया
author img

By

Published : Oct 10, 2020, 6:26 PM IST

सेऊल - उत्तर कोरियात सत्ताधारी पक्षाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सत्ताधारी 'कामगार पक्षा'च्या वर्धापन दिनानिमित्त भव्य लष्करी संचलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी किम जोंग उन यांनी नवीन आण्विक शस्त्रांचे अनावरण केले व जगासमोर आपले शक्तीप्रदर्शन केले.

पोंगयांगयेथे किम संग क्वेअर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे लष्करी संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उत्तर कोरियातील राष्ट्रीय माध्यमांनी याचे थेट प्रक्षेपण केले. केसाँग प्रांतात झालेल्या नैसर्गिक आपत्तीदरम्यान बेघर झालेल्या नागरिकांना सत्ताधारी पक्षाच्यावतीने नवीन घरांचा ताबा दिला गेला. या नागरिकांनी सत्ताधारी पक्ष आणि किम जोंग उन यांची स्तुती करत त्यांना 'काळजी घेणारे वडिल' असे म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली.

सत्ताधारी पक्षाने ७५वर्षे पूर्ण केल्याने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरियासाठी एक शुभेच्छा संदेश पाठवला आहे. चीन कोरियासोबत असलेले संबंध जोपासण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करेल, असे या संदेशात म्हटले आहे.

उत्तर कोरियाने लष्करी संचलनात नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्र आणि आण्विक शस्त्रांचे प्रदर्शन करेल. जेणे करून जगाला त्यांच्या ताकदीचे दर्शन होईल, अशी माहिती दक्षिण कोरियन विश्लेषकांनी अगोदरच दिली होती. परराष्ट्रीय संबंधांवरून खवळलेल्या किम जोंग उन यांनी अमेरिकेसारख्या गुंडांचा सामना करण्यासाठी आण्विक शस्त्रांची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.