कोलंबो - श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी रविवारी देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. कोलंबोमधील ऐतिहासिक बौद्ध मंदिरात राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
देशाच्या संसदीय निवडणुकीत राजपक्षे यांच्या पक्षाच्या श्रीलंका पीपल्स पार्टीने (एसएलपीपी) मोठा विजय मिळविला आहे. उत्तर कोलंबोच्या केलानिया येथील राजमाह विहार बौद्ध मंदिरात महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. महिंदा राजपक्षे यांना त्यांचे धाकटे बंधू आणि देशाचे अध्यक्ष गोतबाया राजपक्षे यांनी दिली.
एसएलपीपीने देशात 5 ऑगस्टला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे. महिंदा राजपक्षे यांना 5 लाखाहून अधिक मते मिळाली आहेत. श्रीलंकेच्या इतिहासात कोणत्याही नेत्याला इतकी मते आतापर्यंत मिळालेली नाहीत. एसएलपीपीने देशातील 145 लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. युतीबरोबर एसएलपीपीने एकूण 150 जागा जिंकल्या आहेत.