बिजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत २ हजार ३४६ जणांचा बळी गेला आहे. एकट्या हुबेई प्रांतात कोरोना विषाणूची लागण ६४ हजार जणांना झाली आहे. मात्र, आता कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
चीनबरोबरच इतर २६ देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. एकट्या दक्षिण कोरियामध्ये ५५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १५ हजार २९९ नागरिक पुर्णतहा: बरे झाले आहेत. मागील २४ तासात नव्याने ६३० रुग्ण आढळून आले आहेत. तर ९६ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला असला तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली नाही. अजूनही अनेक देशांनी चीनमध्ये जाण्यायेण्याबाबत लागू केलेले निर्बंध तसेच ठेवले आहेत. याबरोबरच अनेक देशांनी चिनबरोबरच्या व्यापार बंद केला आहे. विषाणू पसरण्याच्या भीतीने हे पाऊल अनेक देशांनी उचलले आहे.
चीन देशाबाहेरही लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संसर्गजन्य आजार असल्याने सगळीकडेच नागरिक सुरक्षा बाळगत आहेत. जपानच्या किनाऱ्यावरील एका जहाजामध्येही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जहाजातील प्रवाशांना अलिप्त ठेवण्यात आले आहे. भारतानेही चीनबरोबरच्या व्यापारात कपात केली आहे. हा व्यापार पुन्हा सुरू करावा अशी मागणी चीनच्या भारतामधील राजदुतांनी केली आहे.