काठमांडू - महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्त नेपाळमध्ये भारतीय दुतावासाने गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केले. नेपाळमधील भारतीय दुतावासामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी नेपाळमधील भारताचे राजदूत मंजीव सिंह पुरी आणि अधिकाऱ्यांनी गांधीजींना श्रद्धांजली वाहिली.
'आज आम्ही महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींची जयंती साजरी करत आहोत. फक्त पंरपरा म्हणून नाही तर त्यामागे मोठा उद्देश आहे. गांधीजींच्या विचारांचे महत्त्व आजही टिकून आहे. भविष्यातही गांधीजींचे विचार लागू होतील, असे मंजीव सिंह पूरी म्हणाले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गांधी जयंतीच्या निमित्ताने जगभरातील दुतावासामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेपाळमध्ये मंगळवारी भारतीय आणि नेपाळच्या कारागिरांनी बनवलेल्या खादी कपड्यांचा 'फॅशन शो' चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.