ETV Bharat / international

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांशी संवाद साधणार; अनेक मुद्यांवर चर्चा - भारत-व्हिएतनाम लेटेस्ट न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हिएतनामचे पंतप्रधान नुग्येन झुआन फुक यांच्याशी व्हर्चुअली संवाद साधणार आहेत. यापूर्वी 3 एप्रिल 2020 रोजी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी दुरध्वनीवरून चर्चा केले होती.

भारत-व्हिएतनाम
भारत-व्हिएतनाम
author img

By

Published : Dec 20, 2020, 4:06 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हिएतनामचे पंतप्रधान नुग्येन झुआन फुक यांच्याशी व्हर्चुअली संवाद साधणार आहेत. दोन्ही नेते सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी विकसित करण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. याचबरोबर ते प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी 2018 मध्ये व्हिएतनामचा दौरा केला होता. त्यानंतर व्हिएतनाम आणि भारतादरम्यानचे संबंध अधिक घट्ट झाले होते. यावेळी व्यापक रणनीतिक भागीदारीवर चर्चा झाली होती. अशी चर्चा आतापर्यंत व्हिएतनामने फक्त चीन आणि रशियासोबत केली आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद 2018 मध्ये व्हिएतनामला गेले होते. यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही 2019 मध्ये व्हिएतनामचा दौरा केला होता. 2018 मध्ये व्हिएतनामचे राष्ट्रपती ट्रॅन दाई आणि पंतप्रधान नुग्येन झुआन फुक यांनीही भारत भेट दिली. तर 13 एप्रिल 2020 रोजी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी दुरध्वनीवरून चर्चा केले होती. याचबरोबर दोन्ही देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, संरक्षण मंत्रीही आगामी काळात परस्पर संवाद साधणार आहेत.

हेही वाचा - मोठ्या स्तरावर इथेनॉलचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना होणार फायदा - नितीन गडकरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.