ETV Bharat / international

भारताकडून कोरोना लसीचे दीड लाख डोस भूटानला भेट

author img

By

Published : Jan 20, 2021, 7:32 AM IST

भारताने दीड लाख 'कोव्हिशिल्ड' कोरोना लसीचे डोस भूटानला भेट दिले आहेत. शेजारी देशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी लस देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

COVID-19
कोरोना लस

मुंबई - भारताने दीड लाख कोरोना लसीचे डोस भूटानला भेट दिले आहेत. शेजारी देशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी मोफत लस देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. मुंबईतील शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज (बुधवार) पहाटे कोरोना लसीचे डोस घेवून विशेष विमान झेपावले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्ड लसीचे दीड लाख डोस आज भूतानला पोहचतील. भारताकडून कोरोना लसीचे मोफत डोस सर्वप्रथम भूटानला मिळाले आहेत. भारत आणि भूटानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही देशांतील व्यापार सुरू होता. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा भारताने मोठ्या प्रमाणात भूतानला केला.

कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी अमेरिका, युरोपसह अनेक देशांनी लसीकरण सुरू केले आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना आणीबाणीच्या काळात वापरासाठी परवाना देण्यात आला आहे. भारताने शेजारील देशांनाही मानवतेच्या भावनेतून लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

शेजारी देशांना भारताची मदत -

भुटान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ या शेजारील देशांना भारत कोरोनाची लस मोफत देणार आहे. मात्र, अद्याप यात पाकिस्तानचा सामवेश झाला नाही. पाकिस्ताननेही भारताकडे अद्याप लसीची मागणी केली नाही, अशी माहिती सरकारमधील सुत्रांनी ईटीव्ही भारतला दिली.

परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची बैठक -

परराष्ट्र मंत्रालय , रसायने आणि खते मंत्रालय, आरोग्य मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला भारत बायोटेक आणि सीरम कंपनीचे प्रतिनिधीही हजर होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोव्हॅक्सीन लस मंगोलिया, ओमान, म्यानमार, बराहीन, फिलिपाईन्स, मालदीव आणि मॉरिशस देशात निर्यात करण्यात येणार आहे. तर कोव्हिशिल्ड लस अफगाणिस्तान, भूटान, बांगलादेश, नेपाळ आणि सेशल्स देशांत पाठवण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.