ETV Bharat / international

हेरगिरी करत असल्याचा आरोप करत चीनला एस-४०० मिसाईल देण्यास रशियाचा नकार..

रशियाने काही दिवसांपूर्वीच चीनवर हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता. दोन्ही राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असूनही रशियाने केलेल्या या आरोपाने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता रशियाने मिसाईलची डिलीव्हरी लांबणीवर टाकली आहे.

In another setback to China, Russia suspends deliveries of S-400 missiles
हेरगिरी करत असल्याचा आरोप करत चीनला एस-४०० मिसाईल देण्यास रशियाचा नकार..
author img

By

Published : Jul 27, 2020, 5:04 PM IST

मॉस्को : रशियाने चीनला पाठवण्यात येणाऱ्या एस-४०० मिसाईल्सची बॅच थांबवली आहे. तसेच, पुन्हा ही बॅच कधी पाठवण्यात येईल याबाबतही रशियाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

चीनच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तामधून ही माहिती समोर आली आहे. या वृत्तपत्राने मात्र रशियाचा हा निर्णय चीनच्या पथ्यावर पडणारा असल्याचे सांगितले आहे. या क्षेपणास्त्रांची डिलीव्हरी करण्याची प्रक्रिया किचकट आहे. चीनला यासाठी काही अधिकारी आणि कर्मचारी ट्रेनिंगसाठी रशियाला पाठवावे लागणार आहेत. तसेच, रशियालाही या मिसाईलसोबत काही तंत्रज्ञ चीनला पाठवावे लागणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढे सगळे करणे शक्य नसल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

२०१८मध्ये रशियाने चीनला एस-४०० मिसाईलची पहिली बॅच दिली होती. एस-४०० या मिसाईलने चारशे किलोमीटर लांब असणारे लक्ष्याचाही वेध घेणे शक्य आहे. तसेच, जमीनीवरुन तीस किलोमीटर उंचीपर्यंतच्या लक्ष्याचा वेध ही मिसाईल घेऊ शकते.

रशियाने काही दिवसांपूर्वीच चीनवर हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता. दोन्ही राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असूनही रशियाने केलेल्या या आरोपाने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता रशियाने मिसाईलची डिलीव्हरी लांबणीवर टाकली आहे.

हेही वाचा : पाकिस्तानातील गुरुद्वारा सिंग सभाचे शीख बांधवांकडे हस्तांतरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.