ETV Bharat / international

मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपाने पाक अस्वस्थ, इम्रान खान यांचा तरुणांना पुस्तके वाचण्याचा सल्ला - पाकिस्तान मानवी हक्क उल्लंघन न्यूज

'या ऑक्टोबरमध्ये मी आमच्या तरुणांना एलिफ शफाक यांनी लिहिलेले 'प्रेमाचे चाळीस नियम' हे पुस्तक वाचावे, असे सुचवतो. दैवी प्रेम, सुफीझम, रूमी आणि त्यांचे मुर्शिद शम्स तब्रिज यांच्याविषयी हे एक प्रेरणादायक पुस्तक आहे. मी काही वर्षांपूर्वी ते वाचले आणि मला खूप प्रेरणा मिळाली,' असे खान यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टसह त्यांनी इन्स्टाग्रामवर पुस्तकाचे छायाचित्र शेअर केले आहे.

पाक पंतप्रधान इम्रान खान न्यूज
पाक पंतप्रधान इम्रान खान न्यूज
author img

By

Published : Oct 4, 2020, 8:06 PM IST

Updated : Oct 5, 2020, 9:09 AM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तान (जीबी) क्षेत्रात पत्रकारांच्या आणि अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची टीका वारंवार होत असल्याने पाकिस्तान आणि तेथील शासक अस्वस्थ झाले आहेत. आता पंतप्रधान इम्रान खान यांनी आता देशातील तरुणांसमोर पुस्तकांची शिफारस करण्यास सुरुवात केली आहे.

‘द न्यूज’ च्या वृत्तानुसार, ऑक्टोबर महिन्यात खान यांनी तरुणांना इस्लामच्या 'जवळ आणण्याचा प्रयत्न' म्हणून एलिफ शफाकच्या 'दि फोर्टी रुल्स ऑफ लव्ह'ची शिफारस पाकिस्तानच्या तरुणांसाठी केली.

'या ऑक्टोबरमध्ये मी आमच्या तरुणांना एलिफ शफाक यांनी लिहिलेले 'प्रेमाचे चाळीस नियम' हे पुस्तक वाचावे, असे सुचवतो. दैवी प्रेम, सुफीझम, रूमी आणि त्यांचे मुर्शिद शम्स तब्रिज यांच्याविषयी हे एक प्रेरणादायक पुस्तक आहे. मी काही वर्षांपूर्वी ते वाचले आणि मला खूप प्रेरणा मिळाली,' असे खान यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टसह त्यांनी इन्स्टाग्रामवर पुस्तकाचे छायाचित्र शेअर केले आहे.

मे महिन्यात, कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर, खान यांनी तरुणांना 'लॉस्ट इस्लामिक हिस्ट्री' हे प्रसिद्ध पुस्तक वाचण्याची शिफारस केली होती.

हेही वाचा - ऑनलाइन फसवणुकीविरोधात यूके आणि भारतीय सुरक्षा दलांचे संयुक्त 'ऑपरेशन'

'लॉकडाउन दिवसात आमच्या देशातील तरूणांना वाचण्यासाठी एक उत्तम पुस्तक. इस्लामिक सभ्यता त्या काळात अधिक महानतेकडे नेली, अशा बाबी या पुस्तकात वाचायला मिळतील, असे त्यांनी म्हटले होते.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने मंगळवारी पाकिस्तानमधील पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील हिंसाचाराच्या वाढत्या धमक्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

"आम्ही पाकिस्तानात पत्रकार आणि मानवी हक्क रक्षणकर्त्यांविरुद्ध, विशेषत: महिला आणि अल्पसंख्यांकांविरुद्ध - ऑनलाईन आणि ऑफलाइन - हिंसाचारासाठी उत्तेजन देण्याची असंख्य उदाहरणे आम्ही समोर ठेवली आहेतच. यातही विशेष चिंताजनक म्हणजे 'धर्मनिंदा करण्याचा आरोप' - ज्यामुळे असा आरोप ठेवलेल्या व्यक्तीसाठी धोकादायक आणि हिंसक स्थिती निर्माण होऊ शकते,' असे मानवाधिकारांसाठी काम करणारे यूएनचे उच्चायुक्त रुपर्ट कोलविले यांच्या प्रवक्त्याने सांगितले.

गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशाबद्दल बोलायचे तर, पाकिस्तान 15 नोव्हेंबर रोजी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेच्या तथाकथित निवडणुका घेण्याच्या विचारात आहे. 'गिलगिट-बाल्टिस्तान' नावाच्या लष्कराच्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशात इस्लामाबादने केलेल्या कारवाईस कोणताही कायदेशीर आधार नाही, असे भारताने म्हटले होते.

हेही वाचा - वादविवाद-चर्चेनंतर फ्लोरिडा, पेनसिल्व्हानियात बिडेन यांना पसंती, ट्रम्पना टाकले मागे

Last Updated : Oct 5, 2020, 9:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.