ETV Bharat / international

पाकिस्तानमधील परिस्थितीवर इम्रान खान यांनी बिल गेट्स यांच्याशी केली चर्चा - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

कोरोना महामारीसंबधित देशातील नवीनतम घडामोडींवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याशी चर्चा केली.

Imran Khan speaks to Bill Gates, discusses COVID-19 crisis

author img

By

Published : Apr 30, 2020, 8:43 AM IST

लाहोर - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून पाकिस्तानमध्येही कोरोनाच फैलाव झाला आहे. कोरोना महामारीसंबधित देशातील नवीनतम घडामोडींवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याशी चर्चा केली. कोरोना लढाईत म्हत्त्वाची भूमिका बजावणारे पोलिओ कर्मचारी आणि पायाभूत सुविधांवर त्यांनी चर्चा केली.

पाकिस्तानधील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 15 हजार 348 वर पोहचला आहे. तर 335 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी बिल गेट्स यांच्याशी फोनवर चर्चा केली. पाकिस्तान कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची बिल गेट्स यांना सांगितले.

बिल गेट्स यांच्याशी बोलताना इम्रान खान यांनी लॉकडाऊनमुळे देशातील लोकांच्या होणाऱ्या उपासमारीवर भर दिला.पाकिस्तान दोन संकटाचा सामना करत आहे. एक म्हणजे कोरोनावर अटकाव आणणे आणि दुसरे म्हणजे लॉकडाऊनमुळे उपासमार होणाऱ्या लोकांना वाचवणे, असे दुहेरी आव्हान पाकिस्तानसमोर आहे, असे ते म्हणाले.

सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यास मदत झाल्याचे खान म्हणाले. तसेच कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात गेट्स फाऊंडेशन आणि अन्य आंतरराष्ट्रीय भागीदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल इम्रान खान यांनी त्यांचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.