ETV Bharat / international

हाँगकाँगमधील चीनच्या दडपशाहीला तैवानचा विरोध, हजारो नागरिक रस्त्यावर

author img

By

Published : Oct 25, 2020, 7:36 PM IST

चिनी सरकारने देश विरोधी कारवायांच्या नावाखाली हाँगकाँगमधील १२ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्या विरोधात आता तैवानमधील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र

तैपेई - चीनने हाँगकाँगमधील लोकशाही चळवळ चिरडण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा पास केला आहे. त्यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे हाँगकाँगवरील नियंत्रण आणखी वाढले आहे. या विरोधात अनेक लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी चळवळ उभी केली आहे. मात्र, चिनी सरकारने देश विरोधी कारवायांच्या नावाखाली १२ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्या विरोधात आता तैवानमधील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

#save12hkyouths अभियान

अटक करण्यात आलेले १२ कार्यकर्ते बोटीने तैवानला जात होते. मात्र, चिनी सुरक्षा दलांनी त्यांना ताब्यात घेतले. सर्वजण अवैधरित्या प्रवास करत असल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर लावला. त्यासह इतर अनेक कठोर कलमांखाली त्यांना अटक केली आहे. या अटकेविरोधात तैवानमध्ये आंदोलन पेटले आहे. यासोबतच न्यूयॉर्क, व्हॅकूव्हर, ऑस्ट्रेलियातील अ‌ॅडलेल शहरात मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. #save12hkyouths नावाने सोशळ मीडियावर अभियान सुरू करण्यात आले आहे.

काळे कपडे घालून निषेध

हाँगकाँगमधील जाशुआ वाँग आणि नाथन लॉ या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर हे अभियान सुरू केले आहे. या आंदोलनाची लाट तैवानमध्ये पोहचली आहे. १२ तरुणांच्या अटकेविरोधात तैवानमधील नागरिक घराबाहेर पडले आहेत. आंदोलनातील अनेकांनी काळे कपडे घालून अटकेचा निषेध केला. तसेच हाँगकाँगच्या उज्वल भविष्यासाठी घोषणा देत चीनचा निषेध केला.

'तेथे लोकशाही राहिली नाही'

उघडपणे दिसतेय की, आता हाँगकाँग पहिल्यासारखे राहिले नाही. मात्र, आम्ही आशा सोडली नाही. हाँगकाँग आता बदलले आहे, हे आम्ही जगाला ओरडून सांगत आहोत. हीच मानसिकता आमची सर्वांची आहे. तेथे लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य राहीले नाही, अशा भावना काही आंदोलकांनी व्यक्त केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.