ETV Bharat / international

इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होसनी मुबारक यांचा मृत्यू; तीन दशके होते सत्ताधीश - होसनी मुबारक यांचा मृत्यू

लष्कराकडून २०११ ला त्यांना पदच्युत करण्यात आले होते. त्यापूर्वी जवळपास तीन दशके ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते. देशात १८ दिवस चालू असलेल्या आंदोलनामुळे ११ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Hosni Mubarak
Hosni Mubarak
author img

By

Published : Feb 25, 2020, 6:41 PM IST

Updated : Feb 25, 2020, 7:10 PM IST

कैरो - इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होसनी मुबारक यांचा मृत्यू झाला. ते ९१ वर्षांचे होते. लष्कराकडून २०११ ला त्यांना पदच्युत करण्यात आले होते. त्यापूर्वी जवळपास तीन दशके ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते. देशात १८ दिवस चालू असलेल्या आंदोलनामुळे ११ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

होसनी मुबारक यांचा मृत्यू झाल्याची माहिती देशातील सरकारी टीव्हीकडून देण्यात आली. या वृत्ताला त्यांच्या नातेवाईकांनीही दुजोरा दिला आहे. देशातील एका आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, त्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती आणि मार्च २०१७ मध्ये त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते.

मुबारक यांचे कैरो रुग्णालयात निधन झाले. जेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. याशिवाय विशेष कोणताही तपशील देण्यात आलेला नाही.

हेही वाचा - दहशतवाद, व्यापारासह अनेक मुद्द्यांवर मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा; तीन अब्ज डॉलरची 'डिफेन्स डील डन'

Last Updated : Feb 25, 2020, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.