हाँगकाँग - गेल्या तीन आठवड्यांत चीनमधील परदेशी लोकांना हॉंगकॉंगमध्ये येताना 14 दिवसांच्या ऐवजी 21 दिवसांसाठी अलगीकरणात रहावे लागणार आहे. यासाठी त्यांना निर्देशित केलेल्या हॉटेलमध्ये राहावे लागेल.
शुक्रवारी एका निवेदनात शहर सरकारने म्हटले आहे की, जे लोक 21 दिवसांच्या काळात दक्षिण आफ्रिकेत दोन तासांपेक्षा जास्त काळ राहिले आहेत, त्यांना हॉंगकॉंगला जाणाऱ्या विमानांवर चढण्यास बंदी घातली जाईल, असे वृत्त सिन्हुआने दिले आहे.
हेही वाचा - अमेरिकेत एका दिवसातील सर्वाधिक ४ लाख नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
2 ते 24 डिसेंबरदरम्यान हाँगकाँगमध्ये दाखल झालेल्या आणि चीनबाहेरील ठिकाणी थांबलेल्यांना विलगीकरणाच्या 19 व्या किंवा 20 व्या दिवसानंतर कोविड चाचणी करून घ्यावी लागेल आणि अहवाल येईपर्यंत विलगीकरणातच रहावे लागेल, असेही सरकारने म्हटले आहे.
हाँगकाँगच्या आरोग्य संरक्षण केंद्रात (सीएचपी) शुक्रवारी 57 नवीन कोविड रुग्ण सापडले असून एकूण संख्या 8 हजार 481 वर पोचली आहे.
सीएचपी प्रेस ब्रिफिंगनुसार, नवीन रुग्णांमध्ये 55 स्थानिक संसर्ग झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
सध्या रुग्णालयांमध्ये आणि आशिया वर्ल्ड-एक्सपो येथील सामुदायिक उपचार सुविधा केंद्रात 940 कोविड - 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 54 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा - जगभरात 7 कोटी 90 लाख जणांना कोरोनाची बाधा; 17 लाख 38 हजार बळी