ETV Bharat / international

South Korea Election : वाचा .. राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांना 'का' मिळतोय टक्कल पडलेल्या लोकांचा पाठिंबा - टक्कल लोकांचा पाठिंबा

केस गळती उपचार हा दक्षिण कोरियामध्ये (South Korea Election Issue) कळीचा मुद्दा बनला आहे. यावेळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार (President Candidate) ली जे-म्युंग (Lee Jae Myung) यांनी लोकांच्या केसगळतीच्या समस्येवर (Hair Fall Problem) उपचार करण्यात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

LEE JAE MYUNG
LEE JAE MYUNG
author img

By

Published : Jan 8, 2022, 4:18 PM IST

Updated : Jan 8, 2022, 4:39 PM IST

सेऊल - केस गळती उपचार हा दक्षिण कोरियामध्ये (South Korea Election Issue) कळीचा मुद्दा बनला आहे. यावेळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार (President Candidate) ली जे-म्युंग (Lee Jae Myung) यांनी लोकांच्या केसगळतीच्या समस्येवर (Hair Fall Problem) उपचार करण्यात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या घोषणेनंतर देशातील इतर प्रश्न मागे पडले आहेत. ली जे-म्युंग हे सध्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे आहेत.

दक्षिण कोरियाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ली जे-म्युंग यांनी जनतेला निवडणूकपूर्व आश्वासन दिले आहे. ज्याची कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याची अपेक्षा नाही. ली जे-म्युंग यांनी वचन दिले आहे की जर त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास, ते केस गळण्याच्या समस्येवर उपचारासाठी आर्थिक मदत करतील. त्यांच्या या घोषणेनंतर ली जे-म्युंग यांना टक्कल पडलेल्या मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सध्या ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मार्चमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत.

केसगळती उपचारासाठी आर्थिक मदत

गेल्या आठवड्यात, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार ली जे-म्युंग यांनी सरकारला केसगळतीसाठी उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. ऑनलाइन ग्रुप्स आणि सोशल मीडियावर केस गळणे ही मोठी समस्या बनली आहे. उत्तर कोरियाचे मुद्दे, अमेरिकेशी संबंध आणि आर्थिक समस्या या केसांच्या गदारोळात परत गेल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील सुमारे 20 टक्के लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. कोणत्याही कारणास्तव केस गळणे हा दक्षिण कोरियाच्या सरकारी विमा योजनेचा भाग नाही.

पोस्टला नागरिकांचा प्रतिसाद

डेमोक्रॅटिक पक्षाच्या ली जे-म्युंग यांनी सांगितले की, केसांची पुन्हा वाढ होणे आणि केस गळणे यावरील उपचार राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत समाविष्ट केले जावे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी टक्कल पडलेल्या लोकांना केस गळतीवर उपचारासाठी तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याबद्दल विचारले आहे. केस गळतीच्या उपचारांबाबत मी एक अचूक धोरण सादर करेन. त्यांच्या पोस्टला उदंड प्रतिसाद मिळाला. यावर एकाने लिहीले की ली जे-म्युंग, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुला ब्लू हाऊसमध्ये लावीन. दुसर्‍या यूजरने लिहिले की राष्ट्रपती, तुम्ही पहिल्यांदाच कोरियाच्या टक्कल पडलेल्या पुरुषांना आशा दिली आहे. तथापि, ली जे-म्युंग यांच्या विरोधकांनी या आश्वासनाबद्दल त्यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा - RABRI DEVI CONTROVERSY : राजदने सुनावले राबडी देवीचे नाव घेण्या आधी विचार करायला हवा होता

Last Updated : Jan 8, 2022, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.