ETV Bharat / international

ऑनर किलिंग- प्रेमविवाह केल्याने वडिलांनी मुलीच्या सासरच्या ७ कुटुंबीयांची केली हत्या - honor killing

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुझफ्परगढ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्याचे आता इतर प्रांतातही पडसाद उमटत आहेत. लोकांनी या घटनेचे निषेध केला आहे. या घटनेतील आरोपी मंझूर हुसैन याच्या फौजिया बीबी आणि खुर्शीद माई या दोन मुली होत्या. फौजिया बीबी यांचा मेहबूब अहमद यांच्यासोबत २०२० मध्ये प्रेमविवाह झाला होता. याला मंझूर हुसैन यांचा विरोध होता. पण त्यांचा विरोध पत्करुन फौजिया यांनी हे लग्न केले होते.

ऑनर किलिंग
ऑनर किलिंग
author img

By

Published : Oct 19, 2021, 2:32 PM IST

Updated : Oct 19, 2021, 2:46 PM IST

लाहोर (पाकिस्तान) - एका मुलीने प्रेमविवाह केला. त्यामुळे तिच्या बापाने धक्कादायक पाऊल उचलले आहे. त्याने मुलीच्या सासरच्या घरातील सात सदस्यांना जीवंत जाळले. त्यांचा आईत होरपळून मृत्यू झाला. या घटनेत दोन मुली, सासू आणि चार नातवंडांचा समावेश आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुझफ्परगढ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्याचे आता इतर प्रांतातही पडसाद उमटत आहेत. लोकांनी या घटनेचे निषेध केला आहे. या घटनेतील आरोपी मंझूर हुसैन याच्या फौजिया बीबी आणि खुर्शीद माई या दोन मुली होत्या. फौजिया बीबी यांचा मेहबूब अहमद यांच्यासोबत २०२० मध्ये प्रेमविवाह झाला होता. याला मंझूर हुसैन यांचा विरोध होता. पण त्यांचा विरोध पत्करुन फौजिया यांनी हे लग्न केले होते.

पण त्याचा राग मंझूर हुसैनच्या मनात होता. त्याने मुलगा साबीर हुसैन यांच्यासोबत कट रचला. दोघांनी मुलीच्या घराला आग लावली. या आगीत फौजिया, तिचा लहान मुलगा, सासू आणि त्यांच्या चार अल्पवयीन मुलांचा होरपोळून मृत्यू झाला. यामध्ये फक्त फौजिया यांचा पती मेहबूब अहमद यांचा जीव सुदैवाने वाचला. त्याने पोलिस ठाण्यात सासरे मंझूर हुसैन आणि साबीर हुसैनविरोधात तक्रार नोंदविली आहे.

मेहबूब यांनी सांगितले, की मी काही कामानिमित्त मुलतान येथे गेलो होतो. मी परत आले तेव्हा घराला आग लागलेली दिसली. मी जरा जवळ जाऊन बघितले तर मंझूर हुसैन आणि साबीर हुसैन हे दोघेही घराजवळून पळून जाताना दिसले. मी दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही.

Last Updated : Oct 19, 2021, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.