नवी दिल्ली / काबूल - अफगाणिस्तानात हिंदुकुश पर्वत रांगांमध्ये ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. ६.३ इतक्याच तीव्रतेचे भूकंपाचे हादरे दिल्ली आणि उत्तर भारतातही जाणवले. तसेच, पाकिस्तानातही या भूकंपाचे धक्के बसले आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास हा भूकंप झाला.
संयुक्त राष्ट्र भूगर्भशास्त्र सर्वेक्षणाच्या (यूएसजीएस) अहवालानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू ईशान्य अफगाणिस्तानातील जार्म प्रांताच्या ५१ किलोमीटर नैऋत्येकडे असल्याची नोंद झाली आहे. तर, हे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली २१० किलोमीटरवर असल्याचेही संस्थेने सांगितले आहे.
-
#WATCH An earthquake with a magnitude of 6.3 on the Richter scale hit Hindu Kush region in Afghanistan. Earthquake tremors also felt in Pakistan's Islamabad and Lahore. pic.twitter.com/npNxkVHYiT
— ANI (@ANI) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH An earthquake with a magnitude of 6.3 on the Richter scale hit Hindu Kush region in Afghanistan. Earthquake tremors also felt in Pakistan's Islamabad and Lahore. pic.twitter.com/npNxkVHYiT
— ANI (@ANI) December 20, 2019#WATCH An earthquake with a magnitude of 6.3 on the Richter scale hit Hindu Kush region in Afghanistan. Earthquake tremors also felt in Pakistan's Islamabad and Lahore. pic.twitter.com/npNxkVHYiT
— ANI (@ANI) December 20, 2019
याशिवाय, पाकिस्तानात लाहोर, इस्लामाबाद आणि उत्तर पाकिस्तानच्या काही भागांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, असे वृत्त स्थानिक वृत्तसंस्था 'डॉन'ने दिले आहे.
या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारताच्या उत्तर भागातील इमारती धोकादायकरीत्या हलू लागल्या. यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेक ठिकाणी कार्यालये आणि घरांमधील छताला लटकवलेले पंखे, दिवे, झुंबरे जोरदार हलू लागली. मात्र, सुदैवाने अद्याप कोणत्याही ठिकाणी जीवित अथवा वित्तहानीचे वृत्त नाही.