बँकॉक - गेल्या दोन आठवड्यांत थायलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा 29 वर पोचला आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यापैकी बहुतेक मृत्यू पूर आणि पाण्यात बुडाल्यामुळे झाले आहेत.
25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत थायलंडमधील 11 दक्षिणेकडील प्रांतातील 101 जिल्ह्यांतील 4 हजार 130 खेड्यांमधील एकूण 5 लाख 55 हजार 194 घरांचे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - चीनमध्ये खाणीतील अपघातात 23 कामगार ठार, एकाला वाचवण्यात यश
सूरत ठाणी, फाट्ठलुंग, सोंगखला, चुम्फॉन, क्राबी, ट्रेंग, सतुन, याला, पट्टानी, नारथिवट आणि नाखों सी थम्मरट या प्रांतांमध्ये वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली.
पूरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी अधिकाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले आणि त्यांना चांगल्या दर्जाचे अन्न-पाणी आणि निवारा उपलब्ध करून दिला.
आपत्ती निवारण आणि शमन विभागाच्या (डीडीपीएम) अहवालानुसार नाखोंमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. दक्षिणेकडील प्रांतांमध्ये गेल्या महिन्याच्या उत्तरार्धापासून वादळामुळे सतत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे महापूर आला असून याची तीव्रता वाढली आहे.
हेही वाचा - अफगाण सैन्याच्या छाप्यात 25 तालिबानी दहशतवादी ठार