बीजींग - कोरोना विषाणूच्या बळींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. चीनमध्ये या विषाणूच्या बळींनी शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १०६ जणांनी या विषाणूमुळे आपला प्राण गमावला आहे. तर सोमवारी या विषाणुचा संसर्ग झालेले आणखी १,३०० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जवळपास चार हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे समजत आहे.
-
#Coronavirus death toll in China rises to 106, nearly 1300 new cases detected, says the government: AFP news agency.
— ANI (@ANI) January 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Coronavirus death toll in China rises to 106, nearly 1300 new cases detected, says the government: AFP news agency.
— ANI (@ANI) January 28, 2020#Coronavirus death toll in China rises to 106, nearly 1300 new cases detected, says the government: AFP news agency.
— ANI (@ANI) January 28, 2020
या विषाणूमुळे जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चीनने जवळपास एक डझनहून अधिक शहरांमधील वाहतूक बंद केली आहे. तसेच नागरिकांनाही देशाबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जवळपास ६० दशलक्ष लोकांच्या दैनंदिन जीवनावर यामुळे परिणाम झाला आहे. तर, चीनमधील नववर्षासाठीच्या सुट्ट्यांचा कालावधी वाढवून, शाळा-विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या विषाणूला लढा देण्यासाठी चीनने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी विशेष रुग्णालय उभारण्याचे काम चीनमध्ये सुरू आहे. तसेच, नवीन असलेल्या या आजारावर लस शोधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
कोरोना विषाणमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. आधीच एखादा आजार असणाऱ्या रुग्णांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.
हेही वाचा : 'कोरोना' व्हायरस : देशभरात ठिकठिकाणी आढळले संशयित रुग्ण; तपासणी सुरू