बीजिंग - चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६५ लोकांनी या विषाणूमुळे आपला प्राण गमावला आहे. तर, आतापर्यंत जवळपास २०,४३८ लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. हे तिघेही केरळमध्ये आढळून आले आहेत. केरळ सरकारने कोरोनाला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या तीनही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
उपचारांना प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या वाढली..
चीनमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तरीही उपचारांना प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे डॉक्टरांना आशेचा किरण दिसला आहे. चीनमध्ये आतापर्यंत ६३२ रुग्ण यातून बरे झाले असल्याची माहिती चीन सरकारने दिली आहे.
हेही वाचा : चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी सरकारवर नाराज, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप..