ETV Bharat / international

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट :  सीसीटीव्ही फुटेजमध्ये बॉम्ब ठेवताना आढळला दहशतवादी - Sri Lanka series blasts

नुकताच समोर आलेल्या व्हिडीओत संशयीत हॉटेलच्या आवारात लाल कारमधून येताना दिसतो. तेथे तो गाडी पार्क करून हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर जातो आणि आपल्या रुमच्या किल्ल्या घेतो.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेला संशयीत
author img

By

Published : Apr 27, 2019, 5:27 PM IST

Updated : Apr 27, 2019, 5:41 PM IST

कोलंबो - श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ 'किंग्सबरी' हॉटेलमधील सीसीटीव्हीचा आहे. यामध्ये संशयीत एका खोलीत बॉम्ब ठेवताना स्पष्टपणे दिसतोय. २१ एप्रिलला इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेमध्ये एकामागून एक ८ बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये जवळपास ३५० लोकांचा मृत्यू झाला होता. तर, ५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

नुकताच समोर आलेल्या व्हिडीओत संशयीत हॉटेलच्या आवारात लाल कारमधून येताना दिसतो. तेथे तो गाडी पार्क करून हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर जातो आणि आपल्या रुमच्या किल्ल्या घेतो. त्यावेळी त्याच्या पाठीवर सामानाने भरलेली मोठी बॅग दिसत आहे. तसेच हातातही एक लहान बॅग असल्याचे दिसते. त्यांनतर तो लिफ्टमध्ये चढून आपल्या खोलीपर्यंत येतो. काही वेळाने पुन्हा खोलीबाहेर येऊन तो त्याच लिफ्टच्या सहाय्याने खाली येऊन हॉटेलबाहेर जातो. दरम्यान थोड्याच वेळात तेथे मोठा स्फोट झाल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

बॉम्ब स्फोटांच्या दुसऱ्या दिवशीच देशभरातील ख्रिस्ती नेत्यांनी रविवारी प्रार्थना करण्यावर तात्पूर्ती बंदी आणली आहे. तर, मुस्लीम नेत्यांनी मृतांना आदरांजली वाहण्यासाठी, शुक्रवारची नमाज मशिदीत पठण न करण्याचे आवाहन केले आहे.

बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. त्यावेळी काही ठिकाणी आणखी बॉम्ब स्फोट झाल्याचे समोर आले होते. तर, काही ठिकाणी तब्बल १५० जिलेटीनच्या कांड्या आढळल्या होत्या.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 27, 2019, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.