बीजिंग - पाकिस्तानने आणखी संबंध दृढ करण्यासाठी चीनच्या बोटींना विशेष आर्थिक क्षेत्रात येण्याची परवानगी दिली आहे. चीनच्या किमान २० मासेमारी करणाऱ्या बोटींनी सिंध आणि बलुचिस्तानमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश केला आहे. या बोटींना पाकिस्तानच्या मच्छिमारांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे.
चीनच्या बोटींना विशेष आर्थिक क्षेत्रात प्रवेश दिल्याने मच्छिमार संघटना पाकिस्तान फिशरफोल्क फोरमने (पीपीएफ) मोठे आंदोलन केले आहे. चीनच्या धरणाच्या मोठ्या प्रकल्पासाठी पाकिस्तानने चीनला जमीन विकली आहे. त्यानंतर समुद्रातील भाग विकण्याचा पाकिस्तान सरकारने निर्णय घेतल्याची टीका पीपीएफने केली आहे. चीनच्या बोटींनी विरोध करण्यासाठी मच्छिमार संघटनेने मोठी मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा-ग्रामीण भागात रोजगार मिळेना; देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ
चीनच्या बोटी पाकिस्तानच्या सागरी भागात आल्याने पाकिस्तानच्या सागरी साधनसंपत्तीचा नाश होणार असल्याची संघटनेला भीती आहे. चीनच्या मच्छिमारांनी पाकिस्तानच्या सागरी भागात येवू नये, असे पाकिस्तानच्या मच्छिमारांची भूमिका आहे. सामान्यत: लहान बोटी समुद्राच्या खोल भागात जाण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे चीनच्या अत्याधुनिक बोटीमुळे मच्छिमारांना त्यांच्या व्यवसायावर होण्याची भीती वाटत आहे.
हेही वाचा-कर्जाची पुनर्रचना योजना १५ सप्टेंबरपर्यंत सुरू करा; केंद्रीय अर्थमंत्र्यांची बँकांना सूचना