बीजींग - गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आणखी ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २५९ जणांचा बळी या विषाणूमुळे गेला आहे. तसेच चीनमध्ये १२ हजार लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
-
Coronavirus death toll now 259 in China, 11,791 confirmed cases
— ANI Digital (@ani_digital) February 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI story | https://t.co/3hPhtuQ3ef pic.twitter.com/Tl8caSPjRo
">Coronavirus death toll now 259 in China, 11,791 confirmed cases
— ANI Digital (@ani_digital) February 1, 2020
Read @ANI story | https://t.co/3hPhtuQ3ef pic.twitter.com/Tl8caSPjRoCoronavirus death toll now 259 in China, 11,791 confirmed cases
— ANI Digital (@ani_digital) February 1, 2020
Read @ANI story | https://t.co/3hPhtuQ3ef pic.twitter.com/Tl8caSPjRo
यामधील ४५ नागरिक हे हुबेई प्रांतामध्ये होते, तर हुबेई प्रांताबाहेर एकाचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने काल (शुक्रवार) जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. चीनने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना प्रवासापासून बंदी केली आहे. त्यामुळे जवळपास ५३ दशलक्ष लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आहे. काही मुख्य शहरांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, केवळ या लोकांसाठी खाद्यपदार्थ नेणाऱ्या ट्रकांना वाहतूकीस परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी चिनी सरकारने भारतीय नागरिकांना परत नेण्यासाठी भारतीय दूतावासासोबत बोलणी सुरू केली होती. त्यानुसार, एअर इंडियाचे विशेष विमान काल (शुक्रवार) दुपारी दिल्लीहून चीनच्या वुहान शहरात गेले होते. आज सकाळी ७.३० च्या दरम्यान हे विमान दिल्लीत दाखल झाले. या विमानातून ३२४ भारतीयांना चीनमधून एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : चीनमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान मायदेशी आणणार नाही!