ढाका- बांगलादेशची राजधानी ढाकायेथे रसायनाच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. यात ६९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून अग्निशमन दलाचे शोध कार्य सुरू आहे.ही आग गोदामात असलेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अली अहमद यांनी दिली आहे.
रात्री १० वाजताच्या सुमारास रसायनाच्या गोदामाला लागलेली आग जवळ्याच्या परिसरात असलेल्या रहिवासी इमारतींमध्ये पसरल्याने लोकांचा मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. आग चार इमारतींमध्ये पसरली होती. या आगीत गोदामात असलेले केमिकल्स, बॉडी स्प्रे आणि बाजूला असलेली प्लास्टिकची दुकानेही जळाली. या दुकानांमुळे आग प्रचंड वाढली होती ज्यामुळे लोकांना बाहेर पडता आले नाही, अशी माहिती अग्निशमन दलकडून देण्यात येत आहे.