ब्रोकन हिल - ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्यातील काही भाग बुधवारी धुळीने अच्छादले होते. धुळीच्या वादळाचा तडाखा बसण्याची ही रविवार नंतरची दुसरी घटना आहे.
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्यातील ब्रोकन हिल शहर पुर्णत: धुळीने पांघरले गेले होते. या भागात नेहमीच धुळीचे वादळ येत असतात. मात्र, हे वादळ मोठे असून यामुळे येथील दृश्यमानता २०० मीटरपर्यंत कमी झाली होती. पोलिसांनी वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याच्या सुचना दिल्या आहेत.
दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरिया राज्यांतही वादळाने तडाखा दिला आहे.