कराची - पाकिस्तानमध्ये हिंदु मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. तर 150 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हिंदु मंदिरावर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय यंत्रणेवर कठोर ताशेरे ओढले होते. असे हल्ले थांबवून दोषींना अटक करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. अशा घटनांनी पाकिस्तानची प्रतिमा विदेशात डागाळत असल्याचे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले होते.
शेकडो लोकांनी हातात काठी, दगडे आणि विटा घेऊन मंदिरावर हल्ला केला होता. या हल्लायात मूर्त्या उद्धवस्त केल्या होत्या. तर काही ठिकाणी मंदिराचा भागही जाळण्यात आला होता. ही घटना रहिमायर खान जिल्ह्यातील भोंग भागामध्ये मध्ये घडली होती. स्थानिक मदरशा परिसरात 8 वर्षांच्या हिंदु मुलाने मलमूत्र विसर्जन केले होते. या प्रकरणी न्यायालयाने मुलाची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात हिंदु मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रहिम यार खान असाद सरफर्ज म्हणाले की, आम्ही 20 संशयितांना मंदिर तोडफोड प्रकरणी अटक केली आहे.
हेही वाचा-पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कर्ता, धनराज पिल्लेंसंबंधीत ईटीव्ही भारतच्या काही आठवणी
पाकिस्तानमध्ये 75 लाख हिंदु-
हिंदु मंदिराच्या तोडफोडीनंतर भारताने दिल्लीमधील पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना समन्स पाठविले आहे. दरम्यान, हिंदु ही पाकिस्तानमधील सर्वात मोठा अल्पसंख्यांक समुदाय आहे. सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये 75 लाख हिंदु राहतात. असे असले तरी हिंदु समुदायानुसार पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये 90 लाखांहून अधिक हिंदु राहतात. पाकिस्तानमध्ये बहुतांश हिंदु हे सिंध प्रांतामध्ये राहतात.
हेही वाचा-जेईई मेन्सच्या तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर; 17 विद्यार्थ्यांनी केली शंभरी पार
पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड -
पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यासंदर्भात लंडनस्थित पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या अनिला गुलजार यांनी पाकिस्तान सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तानात 828 पैकी फक्त 20 मंदिरेच बाकी आहेत, असे त्या म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रदेशात हिंदू मंदिराची तोडफोड झाली होती. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याकाच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे