काबूल - अफगाणिस्तानात १५ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाण विशेष लष्करी दलाच्या कारवाईत हे दहशतवादी ठार झाले. देशाच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या कंदहारमध्ये शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
निश जिल्ह्यातील खिंजाक या भागात शुक्रवारी या कारवाईला सुरुवात करण्यात आली. अफगाणि राष्ट्रीय लष्करी विशेष कारवाई दलाने ही माहिती जारी केली आहे. तालिबानने याविषयी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.