ETV Bharat / international

अफगाण सैन्याच्या कारवाईत इस्लामिक स्टेटचा दहशतवादी नेता ठार - इस्लामिक स्टेट दहशतवादी ठार

पूर्व अफगाणिस्तानात एका कारवाईत इस्लामिक स्टेटच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ठार करण्यात आल्याचे अफगाणिस्तानच्या इंटेलिजन्स सर्व्हिसने म्हटले आहे. असदुल्ला ओरकझई असे त्याचे नाव असून तो इस्लामिक स्टेटचा एक गुप्तचर नेता होता आणि विशेष सैन्याने त्याला जलालाबादजवळ ठार केले.

इस्लामिक स्टेटचा दहशतवादी नेता ठार
इस्लामिक स्टेटचा दहशतवादी नेता ठार
author img

By

Published : Aug 2, 2020, 6:54 PM IST

काबूल - पूर्व अफगाणिस्तानात एका कारवाईत इस्लामिक स्टेटच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ठार करण्यात आल्याचे अफगाणिस्तानच्या इंटेलिजन्स सर्व्हिसने म्हटले आहे. असदुल्ला ओरकझई असे त्याचे नाव असून तो इस्लामिक स्टेटचा एक गुप्तचर नेता होता आणि विशेष सैन्याने त्याला जलालाबादजवळ ठार केले. शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.

अफगाणिस्तानमधील सैन्य आणि नागरिकांना लक्ष्य करून झालेल्या अनेक प्राणघातक हल्ल्यांमध्ये ओरकझीचा हात असल्याचा गुप्तचर यंत्रणेचा संशय होता.

अफगाणिस्तानमध्ये या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशभरात झालेल्या हिंसाचारात ठार आणि जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रमाणात मागील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत 13 टक्के घट झाली आहे, असे गेल्या आठवड्यात, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले होते.

या अहवालात म्हटले आहे की, 2020 च्या पहिल्या सहा महिन्यांत संयुक्त राष्ट्र संघाने आयएसने 17 हल्ले केले. गतवर्षी याच कालावधीत 97 हल्ले झाले आहेत. अफगाणिस्तानात 2020 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये हिंसाचारात 1 हजार 282 लोक मारले गेले आणि 2 हजार 176 जखमी झाले, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

मार्च महिन्यात इस्लामिक स्टेटच्या एका बंदूकधार्‍याने अफगाणच्या राजधानीच्या मध्यभागी असलेल्या शीख मंदिरात तोडफोड केली. यात 25 उपासक ठार आणि आठ जण जखमी झाले. काही तासांतच इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

आंतरराष्ट्रीय सैन्याच्या मदतीने अफगाण विशेष दलाने इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न केला असता, या बंदूकधाऱ्याने बर्‍याच भाविकांना कित्येक तासांना ओलीस ठेवले होते. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश होता. अफगाण विशेष दलाने यातून 80 भाविकांची सुटका केली. ते सर्व या गुरुद्वारामध्ये अडकले होते. बंदूकधार्‍यांने स्वयंचलित रायफलीने येथील गर्दीवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.