कराची - पाकिस्तानच्या सिंध प्रांतांमध्ये तबलिगी जमातचे 429 जण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब प्रांताच्या रायविंडमध्ये तबलिघी जमातच्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झालेले 429 जण कोरोनाबाधित आहेत, असे सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुरा अली शाह यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये शुक्रवारी 137 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7260 वर गेली आहे.
दरम्यान, भारतातही मरकजमधून आलेल्या अनेक मुस्लीम लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीमध्ये याची संख्या मोठी आहे. दिल्लीत एकूण कोरोनाबाधितांच्या 68 टक्के लोक तबलिगी जमातच्या मरकजमध्ये उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमातून देशातील विविध ठिकाणी गेलेल्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.