भारत-पाकिस्तान दरम्यान असलेल्या नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारामुळे 20 ऑक्टोबर हा रक्तरंजित दिवस ठरला. या गोळीबारामध्ये तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये सैनिकांसह नागरिकांचादेखील समावेश होता. आपले मोठे नुकसान झाल्याचे दोन्ही देशांनी सांगितले. भारतीय लष्काराने पाकिस्तानचे बंकर नष्ट केले. याचबरोबर दहशतवाद्यांची ३ तळ उद्ध्वस्त केल्याचे आणि पाकिस्तानचे ६ ते ९ जवान मारल्याचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले. मात्र, भारताचा दावा फेटाळत गोळीबारात ९ भारतीय सैनिकांना मारल्याचे पाकिस्तानी लष्कराने सांगितले.
भारत आणि पाकिस्तान नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान शाब्दिक युद्ध सुरू होते. दोन्ही बाजूंचे 'ट्विटर वॉरियर्स' गोळीबाराचे आणि बंकर उडवल्याचे बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत. यामुळे वास्तविक संघर्ष अस्पष्ट होतो आहे.
नियंत्रण रेषेवर सतत होत असलेल्या गोळीबारामुळे 2003 ला भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धविराम करार करण्यात आला. मात्र, आज या युद्धविराम कराराला बहुधा अर्थ राहिला नाहिये. 2018 मध्ये अर्निया सेक्टरमधील जवळपास 76 हजार गावकऱ्यांनी पाकिस्तानी गोळीबारातून बचावासाठी आपली घरे सोडली. हेच दृश्य सीमेच्या दुसर्या बाजूलाही पाहायला मिळाले.
2013 ला सर्व काही बदलले. पाकिस्तानमधील लष्कर काश्मिरमधील सुरक्षा परिस्थिती सुधारत असल्यामुळे आणि तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विजयामुळे अस्वस्थ होते. ज्यांची भारताप्रती भूमिका मवाळ होती. अस्वस्थ लष्कारने हिरानगर, सांबा आणि जंगलोट येथील सुरक्षा दलाच्या छावण्यांवर हल्ले केले आणि स्थिती बदलत गेली. भारतातील 2014 च्या लोकसभा निवडणुकानंतर मोदी सरकारने दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेतली. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढले. 2012 मध्ये 100 वेळा झालेले नियत्रंण रेषेवरील उल्लंघनामध्ये वाढ होऊन ती 2018 मध्ये 2 हजार एवढी झाली.
घुसखोरांना भारतामध्ये प्रवेश करता यावा, त्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानी सैनिक गोळीबार करतात. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2014 ते 2018 दरम्यान 1,461 घुसखोरांनी जम्मू काश्मीरमधील नियत्रंण रेषा पार करून भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर गोळीबार हा फक्त घुसखोरांसाठी नाही तर पुढच्या शत्रूला जिंकू न देण्यासाठीही होतो. वर्चस्वाच्या या प्रयत्नात, सैनिकांचा जीव जातो. हे आपण 20 ऑक्टोबर रोजी पाहिलेच. एकमेंकावर नजर ठेवण्याचा चिथावणीखोर स्वभाव दोन्ही देशांना तत्वे आणि मुल्यांपासून दूर नेत आहे.
सध्या होत असलेल्या हिंसाचाराच्या चक्रव्यूहमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का? सोपे सिद्धांत आणि अंमलबजावणीमध्ये कठिण हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पाकिस्तानने घुसखोरींवर नजर ठेवल्यास हिंसाचार आपोआप कमी होईल. त्यामुळे भारतालाही प्रतिउत्तर देण्यासाठी गोळीबार करावा लागणार नाही. मात्र पाकिस्तान अशी काही भूमिका घेईल, असे वाटत नाही. त्याच्या भूमीवरून भारतामध्ये घुसखोरी होत आहे. हेही ते कबूल करणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान दरम्यान नवा कायदा लागू केल्यास हिंसाचार कमी होवून शांतता प्रस्थापित करण्यास थोडा वाव आहे. सध्याचे भीषण वास्तव म्हणजे, अल्पावधीतच परिस्थितीत काही बदल होण्याची शक्यता नाही.