कॅलिफोर्निया - ट्विटरने त्यांच्या अकाऊंट पॉलिसीमध्ये नवी सुधारणा आणली आहे. बऱ्याच काळासाठी लॉग इन न करण्यात आलेली आणि ट्विट न केलेली अकाऊंटस काढून टाकण्याची घोषणा ट्विटरने केली आहे.
आपल्या युजर्सनी किमान ६ महिन्यांतून एकदा आपल्या अकाऊंटवर जावे आणि ट्विट करावे, यासाठी ट्विटरने हा उपाय केला आहे. ११ डिसेंबर २०१९ पासून हा नवा नियम लागू होणार आहे.
मोठ्या काळासाठी लॉग इन न करणारे आणि निष्क्रिय राहणारे युजर्स कोण आहेत, याची माहिती घेऊन त्यांची अकाऊंटस डिलीट केली जाणार आहेत. यामुळे आता सहा महिन्यांत एकदा तरी अकाऊंटला लॉग इन करून ट्विट करावेच लागणार आहे.