ETV Bharat / international

अमेरिकन सावित्रीने पतीचे प्राण ज्वालामुखीतून आणले परत - honeymoon trip

एका अमेरिकन सावित्रीने पतीचे प्राण ज्वालामुखीतून परत आणल्याची घटना घडली आहे. ज्वालामुखीत पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी ही महिला जीव धोक्यात घालून ५० फूट खोल खड्ड्यात उतरली. या सावित्रीने ज्वालामुखीतून पतीला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.

अमेरिकन जोडपे
author img

By

Published : Jul 29, 2019, 11:47 PM IST

माउंट लिआमुईगा - सावित्रीने पती सत्यवानाचे प्राण यमराजाच्या हातून परत आणल्याची आख्यायिका आहे. अशाच एका अमेरिकन सावित्रीने पतीचे प्राण ज्वालामुखीतून परत आणल्याची घटना घडली आहे. ज्वालामुखीत पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी ही महिला जीव धोक्यात घालून ५० फूट खोल खड्ड्यात उतरली. या सावित्रीने ज्वालामुखीतून पतीला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.

wife saves husbands life
जखमी क्ले लवकरच बरा होणार

क्ले चास्टौन आणि त्याची पत्नी अकायमी हे जोडपे मधुचंद्रासाठी कॅरेबियन बेटांवर गेले होते. येथील सेंट किट्सवर माउंट लिआमुईगा या ठिकाणी ते साहसी गिर्यारोहणासाठी गेले. कोणाचीही मदत न घेता, वाटाड्या सोबत न घेता ३ हजार ७०० फूटावरील शिखर गाठण्याचे ठरवले. शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांना एक मृत ज्वालामुखी दिसला. उत्सुकतेपोटी दोघेही हार्नेस आणि क्लिप्सच्या सहाय्याने दोर लावून ज्वालामुखीमध्ये डोकावले. मात्र, दुर्दैवाने क्ले चास्टैनने सुरक्षेसाठी वापरलेली दोरी तुटली आणि तो ५० फूट खोल ज्वालामुखीत पडला.

wife saves husbands life
फेसबुकवर शेअर केला अनुभव
पती ज्वालामुखीमध्ये पडल्यानंतर अकायमी घाबरली. मात्र त्यावेळी तेथे कोणीच नसल्याने आपल्यालाच आपल्या पतीला वाचवावे लागणार आहे, याची तिला जाणीव झाली. अखेर तिने दोरीच्या सहाय्याने खाली उतरण्याचे ठरवले. अकायमी ज्वालामुखीमध्ये उतरली तेव्हा ज्वालामुखी मृत अवस्थेत असल्याने त्याच्या भिंतीवर बरीच लहान मोठी झाडे आणि वनस्पती असल्याचे तिच्या लक्षात आले. याच झाडांमध्ये क्ले अडकून पडल्याचे तिला दिसले.
wife saves husbands life
फेसबुकवर शेअर केला अनुभव
‘क्ले एवढ्या वरुन पडूनही शुद्धीवर होता. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. मी त्याला आधार देत वर घेऊन आले. त्याच्या नाकाला, पाठीला थोडीफार दुखापत झाली होती आणि एका कानाने त्याला काही काळ ऐकू येत नव्हते,’ अशी माहिती अकायमीने दिली. इतक्या उंचावरून पडूनही क्लेचे कोणतेही हाड तुटले नसून केवळ मुका मार लागला आहे. तो लवकरच बरा होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे अशी माहिती अकायमीने दिली. अकायमी आणि क्ले या दोघांनीही हा सर्व प्रसंग त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला आहे.

Intro:Body:

wife saves husbands life after he falls down into dead volcano during honeymoon trip

wife, husband, dead volcano, honeymoon trip, america

---------------

अमेरिकन सावित्रीने पतीचे प्राण ज्वालामुखीतून आणले परत

माउंट लिआमुईगा - सावित्रीने पती सत्यवानाचे प्राण यमराजाच्या हातून परत आणल्याची आख्यायिका आहे. अशाच एका अमेरिकन सावित्रीने पतीचे प्राण ज्वालामुखीतून परत आणल्याची घटना घडली आहे. ज्वालामुखीत पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी ही महिला जीव धोक्यात घालून ५० फूट खोल खड्ड्यात उतरली. या सावित्रीने ज्वालामुखीतून पतीला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.

क्ले चास्टौन आणि त्याची पत्नी अकायमी हे जोडपे मधुचंद्रासाठी कॅरेबियन बेटांवर गेले होते. येथील सेंट किट्सवर माउंट लिआमुईगा या ठिकाणी ते साहसी गिर्यारोहणासाठी गेले. कोणाचीही मदत न घेता, वाटाड्या सोबत न घेता ३ हजार ७०० फूटावरील शिखर गाठण्याचे ठरवले. शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांना एक मृत ज्वालामुखी दिसला. उत्सुकतेपोटी दोघेही हार्नेस आणि क्लिप्सच्या सहाय्याने दोर लावून ज्वालामुखीमध्ये डोकावले. मात्र, दुर्दैवाने क्ले चास्टैनने सुरक्षेसाठी वापरलेली दोरी तुटली आणि तो ५० फूट खोल ज्वालामुखीत पडला.

पती ज्वालामुखीमध्ये पडल्यानंतर अकायमी घाबरली. मात्र त्यावेळी तेथे कोणीच नसल्याने आपल्यालाच आपल्या पतीला वाचवावे लागणार आहे, याची तिला जाणीव झाली. अखेर तिने दोरीच्या सहाय्याने खाली उतरण्याचे ठरवले. अकायमी ज्वालामुखीमध्ये उतरली तेव्हा ज्वालामुखी मृत अवस्थेत असल्याने त्याच्या भिंतीवर बरीच लहान मोठी झाडे आणि वनस्पती असल्याचे तिच्या लक्षात आले. याच झाडांमध्ये क्ले अडकून पडल्याचे तिला दिसले.

‘क्ले एवढ्या वरुन पडूनही शुद्धीवर होता. त्याला जास्त दुखापत झाली नव्हती. मी त्याला आधार देत वर घेऊन आले. त्याच्या नाकाला, पाठीला थोडीफार दुखापत झाली होती आणि एका कानाने त्याला काही काळ ऐकू येत नव्हते,’ अशी माहिती अकायमीने दिली. आश्चर्यकारकरीत्या क्लेचे कोणतेही हाड तुटले नसून केवळ मुका मार लागला आहे. तो लवकरच बरा होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे अशी माहिती अकायमीने दिली. अकायमी आणि क्ले या दोघांनीही हा सर्व प्रसंग त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.