ETV Bharat / international

'चीन दडपशाहीतून स्वत:च्याच नागरिकांची ओळख आणि संस्कृती पुसून टाकतोय' - उयघुर मुस्लीम

तिबेट आणि झिंजियांग प्रांतातील  दहशतवाद संपवणे हा चीन सरकारचा उद्देश नाही. दडपशाहीतून चीन स्व:तच्या नागरिकांची सांस्कृतिक ओळख पुसून टाकत आहे - माईक पोम्पेओ

माईक पोम्पेओ
माईक पोम्पेओ
author img

By

Published : Dec 29, 2019, 4:57 PM IST

वॉशिंग्टन डी सी - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांनी चीनच्या दडपशाही भूमिकेवर चांगलाच हल्ला केला आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष उयघुर मुस्लीम आणि तिबेटी नागरिकांना चांगली वागणूक देत नाही. धाकदपटशाचा वापर करून चीन सरकार स्व:च्याच नागरिकांची ओळख आणि संस्कृती पुसून टाकत आहे, असे म्हणत पोम्पेओ यांनी चीनवर हल्ला केला.

हेही वाचा - इजिप्तमध्ये पर्यटकांच्या बसला अपघात, सोळा भारतीयांचा समावेश

तिबेट आणि झिंजियांग प्रांतातील दहशतवाद संपवणे हा चीन सरकारचा उद्देश नाही. दडपशाहीतून चीन स्वतःच्या नागरिकांची संस्कृती आणि विश्वास पुसून टाकत आहे. प्रत्येक समाजाने धार्मिक स्वांतत्र्याचा आदर आणि संरक्षण केले पाहिजे, असे ट्विट पोम्पेओ यांनी केले आहे.

हेही वाचा - चीन, रशिया अन् इराणमध्ये होणार संयुक्त नौदल सराव

चीनमधील झिंजियांग प्रांतामध्ये उयघुर मुस्लीम मोठ्या संख्येने राहतात. तेथील एका कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरुंगातून मागील काही दिवसांपूर्वी गोपनीय कागदपत्रे उघड झाली होती. त्यातून चीनमधील तुरुंगामध्ये उयघुर मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पोम्पेओ यांची प्रतिक्रिया आली आहे.

झिंजियांग प्रांतामध्ये मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात डिटेन्शन सेंटर स्थापन केल्याचीही माहिती पुढे आली आहे. मात्र, ते डिटेन्शन सेंटर नसून त्यातून स्थानिक नागरिकांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येते, असा चीन सरकारने दावा केला आहे.

चीनमधील झिंजियांग प्रांतातील मुस्लिमांना सरकार चांगली वागणूक देत नसल्याची माहिती अनेक वेळा चर्चेला आली आहे. जगभरातून यावर प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. तिबेटमधील धर्मगुरू १९५९ मध्ये चीन सरकार विरोधातील उठाव अयशस्वी झाल्यानंतर भारतामध्ये शरणार्थी म्हणून आले आहेत. तेव्हापासून भारतातील हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे 'तिबेटन गव्हर्नमेंट इन एक्झाईल' स्थापण करण्यात आले आहे.

Intro:Body:

चीन दडपशाहीतून स्वत:च्याच नागरिकांची ओळख आणि संस्कृती पुसून टाकतोय

वॉशिंग्टन डी सी - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांनी चीनच्या दमनकारी भूमिकेवर चांगलाच हल्ला केला आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष उयघुर मुस्लीम आणि तेबेटीयन नागरिकांना चांगली वागणूक देत नाही. दडपशाही करून चीन सरकार स्व:च्याच नागरिकांची ओळख आणि संस्कृती पुसून टाकत आहे, असे म्हणत पोम्पेओ यांनी चीनवर हल्ला केला.

तिबेट आणि झिंजियांग प्रांतातील  दहशतवाद संपवणे हा चीन सरकारचा उद्देश नाही. दडपशाहीतून चीन स्व:तच्या नागरिकांची संस्कृती आणि विश्वास पुसून टाकत आहे. प्रत्येक समाजाने धार्मीक स्वांतत्र्याचा आदार आणि संरक्षण केले पाहिजे, असे ट्विट पोम्पेओ यांनी केले आहे.

चीनमधील झिंजियांग प्रांतामध्ये उयघुर मुस्लीम मोठ्या संख्येने राहतात. तेथील एका कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरुंगातून मागील काही दिवसांपूर्वी गोपनीय कागदपत्रे उघड झाली होती. त्यातून चीनमधील तुरुंगामध्ये उयघुर मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पोम्पेओ यांची प्रतिक्रिया आली आहे.

झिंजियांग प्रांतामध्ये मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात डिटेंशन सेंटर स्थापन केल्याचीही माहिती पुढे आली आहे. मात्र, ते डिटेंशन सेंटर नसून त्यातून स्थानिक नागरिकांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येते, असा चीन सरकारचा दावा केला आहे.

चीनमधील झिंजियांग प्रांतातील मुस्लिमांना सरकार चांगली वागणूक देत नसल्याची माहिती अनेक वेळा चर्चेला आली आहे. जगभरातून यावर प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. तिबेटमधील धर्मगुरू १९५९ मध्ये चीन सरकार विरोधातील उठाव अयशस्वी झाल्यानंतर भारतामध्ये शरणार्थी म्हणून आले आहेत. तेव्हापासून भारतातील हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे 'तिबेटीयन गव्हर्नमेंट इन एक्झाईल' स्थापण करण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.