ETV Bharat / international

अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांवर, सुमारे साठ हजार नागरिकांचा मृत्यू..

अमेरिकेतील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या, ही आता तब्बल दोन दशके (१९५५-१९७५) चाललेल्या व्हिएतनाम युद्धातील बळींपेक्षाही जास्त झाली आहे. यूएस नॅशनल अर्काईव्ह्ज नुसार, व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेच्या ५८,२२० सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

US virus cases cross 1mn; death toll jumps American fatalities in Vietnam War
अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांवर, सुमारे साठ हजार नागरिकांचा मृत्यू..
author img

By

Published : Apr 29, 2020, 12:50 PM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णांनी मंगळवारी दहा लाखांचा टप्पा ओलांडला. तर, देशातील कोरोनाच्या बळींची संख्याही ५८,३०० वर पोहोचली आहे. यामुळे आता अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या ही जगभरातील रुग्णांच्या एक तृतियांश झाली आहे, तर बळींची संख्या जगातील बळींच्या एक चतुर्थांश झाली आहे.

अमेरिकेतील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या, ही आता तब्बल दोन दशके (१९५५-१९७५) चाललेल्या व्हिएतनाम युद्धातील बळींपेक्षाही जास्त झाली आहे. यूएस नॅशनल अर्काईव्ह्ज नुसार, व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेच्या ५८,२२० सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचा प्रभाव लवकरच कमी होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. न भूतो न भविष्यती अशा संकटाला आपण तोंड देत आहोत. मात्र, शेवटी विजय आपलाच होणार आहे. अमेरिका ही पुन्हा एकदा सुरक्षितरित्या आणि लवकरात लवकर पुढे येईल, असे ते व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात म्हटले.

दरम्यान, अमेरिकेतील कित्येक राज्यांनी व्यापार सुरू करण्यास सुरुवात केली आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेव्हिन न्यूसोम यांनी टप्प्या टप्प्यांमध्ये राज्यातील सर्व व्यवहार सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कॅलिफोर्नियामध्ये आतापर्यंत कोरोनाच्या १,८०० बळींची नोंद झाली आहे. यासोबतच, टेक्सासमध्येही पहिल्या टप्प्यातील व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. टेन्नेसीमध्ये उपाहारगृहे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर, पेनिसेल्वेनिया राज्यातील व्यवहार ३ मे नंतर टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे राज्याच्या गव्हर्नरनी जाहीर केले आहे.

तर अमेरिकेतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या न्यूयॉर्कमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा आणि व्यवहार १५ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा : विनामास्क रुग्णालयात गेल्यानं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.