नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी संयम बाळगावा. त्याचबरोबर पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असे अमेरिकेकडून पाकिस्तानला सांगण्यात आले आहे. आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात असून त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल अशा कुठलाही कारवाईला प्रोत्साहन देऊ नये, असे अमेरीकेचे विदेश मंत्री माइक पोम्पिओ यांनी म्हटले आहे.
भारतीय हवाईदलाकडून मंगळवारी पाकिस्तानातील जैशच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला होता. ही कारवाई पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानाकडून लवकरच या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यात येईल असे, पाकिस्तान विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. सद्या दोन्ही देशांच्या सिमेवर तणावाची परिस्थिती असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आम्ही पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी चर्चा केली आहे. सिमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल अशा कुठलाही कारवाईला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन पाकिस्तानला केले असल्याचे माइक पोम्पिओ यांनी म्हटले. दरम्यान, भारत सरकारकडून या कारवाई बद्दलची माहिती अमेरिकेला देण्यात आली आहे. भारताकडून करण्यात आलेली कारवाई लष्करी नसून यात दशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांकडून भारतात हल्ला करण्याची योजना बनवल्या जात असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचेही भारतीय विदेश मंत्रालयाने सांगितले आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)