मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नसली तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वर्षांपूर्वी मिळालेल्या मतांची संख्या सहजतेने ओलांडली आहे. 2016 मध्ये त्यांनी 63 दशलक्ष मते मिळवली होती. मात्र, आता सध्या त्यांनी 70 दशलक्षचा आकडा पार केला आहे. तर जो बिडेन यांनी सुमारे 7,48,11,378 दशलक्ष मते मिळविली आहेत.
US election 2020 LIVE : व्हाईट हाऊसमधील घुसखोरांना हुसकावून बाहेर काढू - बायडेन - अमेरिका राष्ट्राध्यक्षपद निवडणूक
17:36 November 07
11:53 November 07
पेन्सिल्व्हेनियामधील मतांचा फरक वाढला; बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर..
जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये पेन्सिल्व्हेनिया राज्यात असणाऱ्या मतांचा फरक वाढतच चालला आहे. सध्या बायडेन ट्रम्प यांच्यापेक्षा तब्बल २७ हजार मतांनी पुढे आहेत. त्यामुळे, पेन्सिल्व्हेनिया राज्यासह, अध्यक्षपदाची निवडणूकही बायडेनच जिंकण्याची शक्यता अधिक दाट झाली आहे.
10:21 November 07
व्हाईट हाऊसमधील घुसखोरांना हुसकावून बाहेर काढू - बायडेन
डोनाल्ड ट्रम्प हे काही केल्या आपली हार होत आहे हे मान्य करण्यास तयार नाहीत. त्यातच जो बायडेन यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. लोक आमचा विरोध करत आहेत, मात्र आम्ही तुमचे शत्रू नाही, आम्हीही अमेरिकन आहोत. जरी विजयाची घोषणा झाली नसली, तरी आकडे पाहता आम्ही जिंकणार आहोत हे नक्की. जिंकल्यानंतर आम्ही व्हाईट हाऊसमध्ये असलेल्या घुसखोरांना हुसकावून बाहेर काढू, असे म्हणत जो बायडेन यांनी ट्रम्प यांना जोरदार टोला लगावला आहे.
02:28 November 07
कायदेशीर लढा देण्यासाठी बायडेन यांचे मदतीचे आवाहन
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले असून न्यायालयात जाण्याचे जाहीर केले आहेत. मतमोजणी थांबिण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, प्रत्येक मत गणले गेले पाहिजे असा पवित्रा बायडेन यांनी घेतला आहे. ट्रम्प यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी निधी देण्याचे आवाहन बायडेन यांनी नागरिकांना केले आहे.
02:18 November 07
डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांची आघाडी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची होत असून पेन्सल्वेनिया, जॉर्जिया राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. तर नवाडा राज्यातील आघाडी राखली आहे. त्यांना विजयासाठी फक्त सहा मतांची गरज आहे.
02:03 November 07
व्हाईट हाऊसचा दावेदार कोण ? पेन्सल्वेनिया, जॉर्जिया राज्यात जो बायडेन आघाडीवर
वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची होत असून पेन्सल्वेनिया, जॉर्जिया राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. तर नवाडा राज्यातील आघाडी राखली आहे. नॉर्थ कॅरोलिना राज्यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत बायडेन यांना २६४ इलेक्टोरल (मते) मिळाली असून ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहे.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार पेन्सल्वेनिया, नवाडा, जॉर्जिया राज्यात जो बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ते विजयाच्या आणखी जवळ पोहचले आहेत. यातील जॉर्जिया राज्यात दोन्ही उमेदवारांत फक्त २ हजार मतांचा फरक आहे. यातील एकाही राज्यात त्यांना बहुमत मिळाले तरी ते विजयी होतील. विजयी होण्यासाठी फक्त ६ मतांची गरज आहे. आघाडीवर अललेल्या राज्यांपैकी एकाही राज्यात बायडेन यांचा विजय झाल्यास त्यांची मतांची बेरीज २७० होऊन ते विजयी होतील. मात्र, अद्याप मतमोजणी सुरू असून काहीही सांगू शकत नाही.