ETV Bharat / international

मानवरहित ड्रोनच्या बदल्यात इराणमधील १५० लोकांना गमवावे लागले असते प्राण - ट्रम्प

author img

By

Published : Jun 22, 2019, 7:20 PM IST

'इराणच्या ३ वेगवेगळ्या प्रदेशांवर हल्ला करण्याची योजना आम्ही केली होती. मात्र, हल्ल्यापूर्वी केवळ १० मिनिटे आधी या निर्णय मागे घेण्यात आला. या युद्धात इराणमधील १५० लोकांना प्राण गमवावे लागले असते. ही जीवितहानी टाळण्यासाठी हल्ल्याचा निर्णय मागे घेतला,' असे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन - इराणने अमेरिकन लष्कराचे ड्रोन पाडले. यानंतर अमेरिकेने इराणवर प्रतिहल्ला चढवण्याची पूर्ण तयारी केली होती. सैन्य सज्ज करण्यात आले होते. मात्र, हल्ल्यापूर्वी केवळ १० मिनिटे आधी या निर्णय मागे घेण्यात आला. या युद्धात इराणमधील १५० लोकांना प्राण गमवावे लागले असते. ही जीवितहानी टाळण्यासाठी हल्ल्याचा निर्णय मागे घेतला, असे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

'सोमवारी आमचे मानवरहित ड्रोन महासागराच्या आंतरराष्ट्रीय पट्ट्यात उड्डाण करत होते. ते इराणने पाडल्यानंतर इराणच्या ३ वेगवेगळ्या प्रदेशांवर हल्ला करण्याची योजना आम्ही केली होती. तेव्हा यामध्ये किती जण मृत्यूमुखी पडतील, हे मी विचारले. तेव्हा आमच्या जनरलनी १५० चा आकडा सांगितला. हे समजताच हल्ल्याच्या केवळ १० मिनिटे आधी मी हा निर्णय मागे घेतला. मानवरहित ड्रोन पाडल्याबद्दल १५० लोकांना प्राणांना मुकावे लागणे योग्य ठरणार नाही, असा विचार करून हल्ला न करण्याचा निर्णय घेतला,' असे ट्विट ट्रम्प यांनी केले.

दरम्यान, अमेरिकेच्या विमानाने आमच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याने आम्ही त्यांचे ड्रोन पाडले, असा दावा इराणने केला. मात्र ड्रोनने इराणच्या हवाई हद्दीचा भंग केला का, याबाबत अमेरिकन प्रशासनातच संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे असा हल्ला हा आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग ठरेल, या निष्कर्षांमुळेच ट्रम्प यांनी घोषणेनंतर दहाच मिनिटांत हल्ल्याची योजना स्थगित केल्याची चर्चा आहे.

Intro:Body:

मानवरहित ड्रोनच्या बदल्यात १५० लोकांना प्राणांना मुकावे लागणे योग्य वाटले नाही - ट्रम्प

वॉशिंग्टन - इराणने अमेरिकेन लष्कराचे ड्रोन पाडले. यानंतर अमेरिकेने इराणवर प्रतिहल्ला चढवण्याची पूर्ण तयारी केली होती. सैन्य सज्ज करण्यात आले होते. मात्र, हल्ल्यापूर्वी केवळ १० मिनिटे आधी या निर्णय मागे घेण्यात आला. या युद्धात इराणमधील १५० लोकांना प्राण गमवावे लागले असते. ही जीवितहानी टाळण्यासाठी हल्ल्याचा निर्णय मागे घेतला, असे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

'सोमवारी आमचे मानवरहित ड्रोन महासागराच्या आंतरराष्ट्रीय पट्ट्यात उड्डाण करत होते. ते इराणने पाडल्यानंतर इराणच्या ३ वेगवेगळ्या प्रदेशांवर हल्ला करण्याची योजना आम्ही केली होता. तेव्हा यामध्ये किती जण मृत्यूमुखी पडतील, हे मी विचारले. तेव्हा आमच्या जनरलनी १५० चा आकडा सांगितला. हे समजताच हल्ल्याच्या केवळ १० मिनिटे आधी मी हा निर्णय मागे घेतला. मानवरहित ड्रोन पाडल्याबद्दल १५० लोकांना प्राणांना मुकावे लागणे योग्य ठरणार नाही, असा विचार करून हल्ला न करण्याचा निर्णय घेतला,' असे  ट्विट ट्रम्प यांनी केले.

दरम्यान, अमेरिकेच्या विमानाने आमच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याने आम्ही त्यांचे ड्रोन पाडले, असा दावा इराणने केला. मात्र ड्रोनने इराणच्या हवाई हद्दीचा भंग केला का, याबाबत अमेरिकन प्रशासनातच संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे असा हल्ला हा आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग ठरेल, या निष्कर्षांमुळेच ट्रम्प यांनी घोषणेनंतर दहाच मिनिटांत हल्ल्याची योजना स्थगित केल्याची चर्चा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.