ETV Bharat / international

अमेरिकेचा ड्रॅगनला दणका; चिनी अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध - human rights issue in China

चीनच्या अधिकाऱ्यांना व्हिसा निर्बंध तर काही अधिकाऱ्यांना अमेरिकेत फिरण्यासाठी मर्यादा असे नियम ट्रम्प प्रशासनाने लागू केले आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री
author img

By

Published : Jul 8, 2020, 1:06 PM IST

वॉशिंग्टन – ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधातील राजनैतिक युद्धात नवे हत्यार उपसले आहे. अमेरिकेने चीनच्या अधिकाऱ्यांना व्हिसा देण्यावर निर्बंध लागू केले आहेत. तिबेटचा भूभाग बळकाविल्याने अमेरिकेने चीनला हा दणका दिला आहे.

चीनच्या अधिकाऱ्यांना व्हिसा निर्बंध तर काही अधिकाऱ्यांना अमेरिकेत फिरण्यासाठी मर्यादा असे नियम ट्रम्प प्रशासनाने लागू केले आहेत. चीनने हाँगकाँगमधील प्रशासनात हस्तक्षेप करणे, चीनमधील प्रश्चिम शिनजियांग प्रांतात मावनी अधिकारांचे उल्लंघन, जागतिक व्यापार, दक्षिण चीन सागरात घुसखोरी या कारणांनी अमेरिकेने चीनला दणका दिला आहे.

चीनकडून विदेशी राजदुतांच्या प्रवासात पद्धतशीरपणे अडथळे आणले जात असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी केला आहे. पॉम्पेओ यांनी व्हिसाचे निर्बंध घोषणा करताना किती चिनी अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसेल, याची माहिती दिली नाही. मात्र, चीनच्या सरकारमधील आणि कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हे व्हिसाचे नियम लागू असणार असल्याचे स्पष्ट केले. तिबेटमध्ये विदेशातील नागरिकांना रोखण्यासाठी धोरण तयार करणारे व अंमलबजावणी अधिकाऱ्यांवरही व्हिसा निर्बंध असल्याचे पॉम्पेओ यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की प्रदेशाच्या स्थिरतेसाठी तिबेटमध्ये प्रवेश देणे हे महत्त्वाचे आहे. चीन सरकारने तिथे मानवी अधिकारांचे उल्लंघन करत आहे. बीजिंग हे पर्यावरणाचे नुकसान टाळण्याकरता अपयशी ठरले आहे.

तिबेटमध्ये विदेशी नागरिकांना चीनने परवानगी द्यावी, यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून चीनवर दबाव वाढविण्यात आहे. चीनने अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांना 1959 मध्ये तिबेटमधून जाण्यासाठी परावृत्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.