ETV Bharat / international

अमेरिकेची कोविड -19वरील उपचारांसाठी अ‌ँटिव्हायरल रेमडेसिव्हिर औषधास पूर्ण मंजूरी - डोनाल्ड ट्रम्प प्रचार लेटेस्ट न्यूज

डब्ल्यूएचओने चार संभाव्य उपचार म्हणून महत्त्वाच्या चाचण्यांचे परिणाम तपासले. या चाचण्यांनंतर त्यांचे परिणामांचे अद्याप बारकाईने पुनरावलोकन आणि समीक्षा करणे बाकी आहे. मात्र, यापैकी कोणत्याही उपचारांनी मृत्यूदरावर किंवा रुग्णांना रुग्णालयात रहावे लागण्याच्या कालावधीवर फारसा परिणाम झाला नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

अमेरिका अ‌ँटीव्हायरल रेमडेसिव्हिर औषध न्यूज

author img

By

Published : Oct 23, 2020, 1:55 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या नियामक मंडळांनी रुग्णालयांमधील कोविड - 19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी अँटिव्हायरल ड्रग रेमडेसिव्हिरला पूर्ण मान्यता दिली आहे. वेक्लरी असे ब्रँडनेम असलेल्या या औषधामुळे बरे होण्याचा कालावधी साधारणपणे पाच दिवसांनी कमी होतो, असे वैद्यकीय चाचण्यांमध्ये दिसले असल्याचे यूएस फूड अ‌ॅण्ड ड्रग अ‌ॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) सांगितले आहे.

कोविड - 19वरील उपचारांसाठी एफडीएची मंजुरी मिळालेले वेक्लरी हे पहिले औषध आहे, असे एफडीएने एका निवेदनात म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गेल्या आठवड्यात सांगितले की, रेमडेसिव्हिरचा रुग्णांच्या जगण्याच्या शक्यतेवर थोडासा परिणाम झाला आहे किंवा काहीच परिणाम झालेला नाही. डब्ल्यूएचओने हे एका अभ्यासावर आधारित असल्याचे म्हटले आहे. मात्र, औषध उत्पादक गिलीडने चाचणीचे निष्कर्ष नाकारले. मे महिन्यापासून रेमडेसिव्हिरला अमेरिकेत केवळ आपात्कालीन वापरासाठी अधिकृत करण्यात आले होते.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना हे औषध देण्यात आले. तेव्हा ते बरे झाले.

हेही वाचा - 'मला जे उपचार मिळाले, तेच अमेरिकन नागरिकांना मोफत मिळणार'

एफडीएने निवेदनात म्हटले आहे की, 'प्रौढ रुग्णांसाठी आणि 12 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या आणि 40 किलोहून अधिक वजन असलेल्या बालरुग्णांच्या उपचारांसाठी या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, हे औषध देण्यासाठी रुग्णाने रुग्णालयात दाखल असणेही बंधनकारक केले आहे.'

'अनेक वैद्यकीय चाचण्यांनंतर संस्थेने काटेकोर मूल्यमापन करून ही मंजुरी दिली आहे. हा कोविड - 19 महामारीच्या काळात वैज्ञानिकदृष्ट्या हा महत्त्वाचा मैलाचा दगड आहे,' असे एफडीएचे आयुक्त स्टीफन हॅन म्हणाले.

'या औषधाच्या कोविड - 19 च्या विविध रुग्णांवर सर्वसमावेशकपणे तीन नियंत्रित चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या कमी प्रमाणात आजारी ते गंभीर आजारी रुग्णांवर याचा परिणाम अभ्यासण्यात आला. एका अभ्यासात वेक्लरी गटाच्या औषधाने कोविड - 19 दिवसांत बरा झाल्याचे समोर आले. तर, प्लेसबो गटाच्या औषधाने तो बरा होण्यास 15 दिवस लागल्याचे दिसले.

डब्ल्यूएचओनेही केल्या होत्या चाचण्या

डब्ल्यूएचओने चार संभाव्य उपचार म्हणून महत्त्वाच्या चाचण्यांचे परिणाम तपासले. यामध्ये रेमडेसिव्हिर, हिवतापावरील औषध हायड्रोक्लोरोक्विन (विषाणूच्या प्रथिनापासून बनवलेले असल्यामुळे याच्यामुळे विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती तयार होते) तसेच, एचआयव्हीवरील उपचारांसाठी एकत्रितपणे वापरली जाणारी लोपिनाविर आणि रायटोनाविर या औषधांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

डेक्सामेथासोन या यूकेमध्ये अतिदक्षता विभागातील कोविड रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या कमी किमतीच्या स्टिरॉइडचा या अभ्यासामध्ये समावेश नाही. वरील चार औषधांची 30 देशांमधील 500 रुग्णालयांतील 11 हजार 266 प्रौढांवर चाचणी करण्यात आली.

या चाचण्यांनंतर त्यांचे परिणामांचे अद्याप बारकाईने पुनरावलोकन आणि समीक्षा करणे बाकी आहे. मात्र, यापैकी कोणत्याही उपचारांनी मृत्युदरावर किंवा रुग्णांना रुग्णालयात रहावे लागण्याच्या कालावधीवर फारसा परिणाम झाला नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

हेही वाचा - मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 'भीती'च्या अस्त्राचा वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.