ETV Bharat / international

अमेरिकेत पूर्ण लसीकरण झालेल्यांना मास्कची सक्ती नाही! - अमेरिका मास्क सक्ती बिडेन घोषणा

"आजचा दिवस हा अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचे पूर्ण लसीकरण (दोन्ही डोस) झाले असेल, तर तुम्हाला मास्क वापरण्याची गरज नाही" असे राष्ट्राध्यक्ष बिडेन म्हणाले. ते रोज गार्डनमधून लोकांना संबोधित करत होते.

Fully vaccinated! 'no longer need masks indoors or outdoors'
'पूर्ण लसीकरण झालेल्यांना मास्कची सक्ती नाही'; अमेरिकेची घोषणा
author img

By

Published : May 14, 2021, 7:12 AM IST

Updated : May 14, 2021, 9:45 AM IST

वॉशिंग्टन : जगभरातील बहुतांश देशांमध्ये आता कोरोनापूर्व परिस्थिती परतत आहे. अमेरिकाही यात मागे राहिली नसून, आता पूर्ण लसीकरण झालेल्यांना देशात मास्कची सक्ती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यक्तींना घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही मास्क वापरणे अनिवार्य नसणार आहे.

"आजचा दिवस हा अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचे पूर्ण लसीकरण (दोन्ही डोस) झाले असेल, तर तुम्हाला मास्क वापरण्याची गरज नाही" असे राष्ट्राध्यक्ष बिडेन म्हणाले. ते रोज गार्डनमधून लोकांना संबोधित करत होते. या भाषणावेळी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मास्क घातला नव्हता. यावेळी त्यांनी नागरिकांनाही लवकरात लवकर लस टोचून घेण्याचे आवाहन केले. लसीकरण पूर्ण होईपर्यंत मास्क वापरणे सुरू ठेवा, असेही त्यांनी नागरिकांना सांगितले.

'पूर्ण लसीकरण झालेल्यांना मास्कची सक्ती नाही'; अमेरिकेची घोषणा

लसीकरण झालेल्यांना फिजिकल डिस्टन्सिंगमधूनही सुटका..

बिडेन यांनी यावेळी अमेरिकेतील नवी नियमावली जाहीर केली. यामध्ये बस, विमान, रुग्णालये, तुरुंग आणि निवारा केंद्रांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी शाळा, उद्योग आणि इतर गोष्टी ज्या लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या होत्या, त्या पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांनी फिजिकल वा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची आवश्यकताही नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : नेपाळ : बहुमत सिद्ध करण्यास विरोधक अयशस्वी; पंतप्रधान म्हणून ओली कायम

Last Updated : May 14, 2021, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.