हैदराबाद : ९ कोटी लोकांनी वैयक्तिक आणि टपालाद्वारे मतदान केले असताना, अमेरिका येत्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत अनेक दशकांमधील सर्वाधिक मतदानाची टक्केवारीची साक्षीदार होण्याची शक्यता आहे. परंतु, ही निवडणूक सर्वात कडवटपणे लढली गेलेली आणि ध्रुवीकरण झालेलीही निवडणूक असेल तसेच या निवडणुकीत रस्त्यावर हिंसाचार होईल, असे भाकित इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपसह अनेक संघटनांनी वर्तवले आहे.
व्हॉइस ऑफ अमेरिकाचे व्हाईट हाऊस ब्युरो प्रमुख स्टीव्हन हर्मन यांनी सांगितले की, जोई बायडेन यांना पाठिंबा देणारे विशेषतः डेमोक्रेटिक पक्षाचे मतदार किंवा अपक्षांमध्ये आणि काही प्रमुख रिपब्लिकन्समध्येसुद्धा आपापल्या उमेदवारांबाबत प्रचंड तणाव आणि उत्कंठा आहे. मिशिगनसारख्या राज्यात उदाहरणार्थ, लोक कदाचित बंदुका घेऊन मतदानाला येतील आणि त्याचा धमकीवजा परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे. परंतु बंदुकांमुळेसुद्घा लोकांच्या बाहेर पडून मतदान करण्याच्या उत्साहावर पाणी पडेल, असे काही संकेत नाहीत. कोरोना विषाणुमुळे लोकांच्या मनात असलेली भीती ही मतदानास बाहेर पडण्यास ते नाखुष असण्याला कारण आहे आणि हेच कारण आहे की,ज्यामुळे लोकांनी आपापल्या मतपत्रिका टपालाद्वारे पाठवल्या आहेत, असेही हर्मन यांना सांगितले.
या महत्वाच्या निवडणुकीपूर्वी, व्हाईट हाऊसचे काही नुकसान होऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालण्याचे काम सुरू आहेच, परंतु वॉशिंग्टन डीसीमधील खासगी व्यावसायिक इमारतींचेही भौतिक नुकसान होऊ नये, म्हणून सिद्धता करण्यात येत आहे. वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांच्याशी बातचीत करताना हर्मन यांनी पुढे सांगितले की, आम्हाला काही दुर्घटना मंगळवारी रात्री नव्हे तर बुधवारी रात्री घडल्याचे दिसतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे, तेव्हाच आमच्यासमोर काय घडत आहे, याबद्दल चित्र स्पष्ट असेल. लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यताही आहे. अति डावे आणि अति उजव्या गटांकडून या वर्षी जी पूर्वी झालेली आंदोलने झाली आहेत, त्यावरून अगदी थोडे लोकही इतर लोकांना चिथावणी देण्यास पुरेसे आहेत आणि नंतर मग ते स्वतःच हिंसाचारावर उतरतात, हे आम्ही पाहिले आहे.
वॉशिंग्टन डीसीचे रस्त्यांसह, आपल्याला इमारतींच्या खिडक्या तोडल्या जाऊ नयेत आणि आगी लावल्या जाऊ नयेत, यासाठी मोठ्या प्रमाणे संरक्षण देण्याचे काम सुरू झाल्याचे दिसते आहे. यावर्षीच्या सुरूवातीला झालेल्या निदर्शनांच्या वेळेस हे पाहिले आहे. खूप प्रमाणात दक्षता घेतली जात आहे. परंतु येत्या काही दिवसात सामूहिक नागरी उठाव पहायला मिळेल, असे काही संकेत नाहीत. परंतु कोणत्याही ठिकाणी झालेला कोणताही प्रसंग घडला तरीही त्यावर प्रखर प्रकाशझोत टाकला जाईल, असे सांगत हर्मन यांनी निवडणूक निकालावर आणि किती फरकाने विजयी उमेदवार विजयी होतो, यावर खूप काही अवलंबून असेल. ही गोष्ट आणखी अधोरेखित केली.
मतदान किती अचूक होते, यावरही निकाल अवलंबून आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांनी निकालांना आपण त्वरित आव्हान देणार असल्याचे संकेत दिले असले तरीही, जोई बायडेन पेनसिल्व्हानियाशिवाय २७० मतदारसंघांत विजय मिळवण्यास सक्षम ठरले तर, बरेचसे नाट्य संपुष्टात आलेले असेल. निवडणुकीच्या सायंकाळीच निकाल लागलेले असतील, असा त्यांचा विश्वास आहे. परंतु अमेरिकन निवडणुकीच्या इतिहासात बहुतेक वेळा हा केवळ अपवादच राहिला आहे, असेही हर्मन यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून हर्मन यांनी अमेरिकन निवडणूक आणि राजकारणाचा बारकाईने अभ्यास केला आहे. निवडणूक निकाल किंवा स्पष्ट भाकित हे अमेरिकन वेळेनुसार ४ नोव्हेंबरला सकाळपर्यंत हाती येण्याची अपेक्षा आहे. परंतु २००० मधील जॉर्ज बुश विरूद्ध अल गोर यांच्या लढतीच्या वेळेस झालेल्या कायदेशीर कडवट लढाईप्रमाणे निकाल कायदेशीर लढ्यात गुरफटून जाण्याची शक्यताही आहे. परंतु असोसिएटेड प्रेसने विजयी उमेदवार जाहीर करण्यावर लक्ष देणे महत्वाचे आहे कारण त्यानंतरच बहुतेक वृत्तवाहिन्या विजयी उमेदवार जाहीर करतील.
आतापर्यंत जोई बायडेन यांनी राष्ट्रीय निवडणुकीत महत्वपूर्ण सातत्यपूर्ण आघाडी घेतली असून जी गेल्या काही दिवसातील प्रचारात एकेरी आकड्यावर आली आहे. परंतु निवडणूक पंडित आणि तज्ञांनी सावध भूमिका घेतली आहे कारण २०१६ च्या सर्व्हेच्या सावल्या अजूनही गडद आहेत, ज्यावेळी हिलरी क्लिंटन यांच्या विजयाचे भाकित सर्वांनी वर्तवले होते. युद्धभूमी ठरलेले राज्य औद्योगिक मध्यपश्चिम पट्ट्यात क्लिंटन यांच्याकडून विजय हिसकावून घेऊन आश्चर्यकारक विजय मिळवण्यात ट्रम्प यशस्वी ठरले होते. याहीवेळी हे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. मतदानावर पडदा पडण्यापूर्वी दोन्ही उमेदवार निश्चित मत न ठरवलेल्या स्विंग स्टेट्सवर आपले लक्ष केंद्रित करत आहेत.
राष्ट्रीय निवडणुकीत बायडेन हे ७ टक्के किंवा ४ टक्क्यांनी पुढे राहिले तरीही, ते काही राज्यांत कमी होऊ शकते आणि तेथेच उमेदवार आपले लक्ष केंद्रित करत आहेत. फ्लोरिडा हे अर्थातच ट्रम्प यांच्यासाठी जिंकलेच पाहिजे, असे राज्य आहे. ट्रम्प यांनी फ्लोरिडा जिंकले नाही तर तो बायडेन यांच्यासाठी विजयाचा मार्ग ठरेल. दोघेही पेनसिल्व्हानिया ही विजयाची खात्रीशीर किल्ली मानतात. सोमवारी अध्यक्ष ट्रम्प मिशिनग राज्यात दोन वेळा प्रचारासाठी येणार आहेत. या युद्धभूमी असलेल्या राज्यात बायडेन अगोदरच १० टक्के पुढे असल्याचे दिसले आहे. म्हणून अध्यक्ष मिशिगन राज्यावर लक्ष का केंद्रित करत आहेत? कदाचित त्यांच्याकडे स्वतःचे जनमत चाचणी असेल जी असे दर्शवत असेल की आघाडी फार कमी आहे. परंतु हेच राज्य डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षापूर्वीच्या आश्चर्यकारक विजयासाठी प्रमुख किल्ली ठरले होते. कारण२०१६ च्या निवडणुकीपूर्वी घेतलेल्या सर्व जनमत चाचण्या या हिलरी यांना विजयी होतील, असे दाखवत होत्या, असे हर्मन म्हणाले.
वरिष्ठ अमेरिकन पत्रकारांनी मंगळवारी प्रतिबद्ध मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणणे सुनिश्चित करण्यासाठी अखेरच्या क्षणाच्या प्रचारावर जोर दिला. या निवडणुकीत खरेतर कुणीच आपले मत बनवलेले नाही, असा नाही. जनमत हे मजबूतरित्या तयार झाले आहे. आम्ही परत उमेदवारांना शेवटच्या काही तासांत अशा प्रचारात का पहात आहोत, हे याचे खरे कारण आहे. अध्यक्ष ट्रम्प कदाचित मंगळवारी सकाळी व्हाईट हाऊसमध्ये परतणारही नाहीत. रविवारी ते मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही फ्लोरिडात एक मेळावा घेत होते. आता जे लोक प्रतिबद्ध आहेत आणि मतदान केलेले नाही, त्यांनी मंगळवारी मतदानास जावे, यासाठी हे सारे काही सुरू आहे. आता तरी यावरच सारा भर आहे. मत बदलण्याचा प्रश्न नाही. लोकांमध्ये मतदानासाठी बाहेर पडण्यास उत्साह निर्माण करणे आणि वैयक्तिक रित्या जाऊन मत देणे यासाठी हे सारे सुरू आहे, असे हर्मन यांनी सांगितले.
- स्मिता शर्मा, नवी दिल्ली