ETV Bharat / international

पत्रकार खाशोगी यांच्या हत्येस सौदी अरेबियाच्या शहजादेने मान्यता दिली होती - अमेरिकेच्या गुप्तचर अहवाल - दी अरेबियाच्या दूतावासात मोहम्मद बिन सलमानच्या लोकांनी हत्या केली

मोहम्मद बिन सलमानने इस्तंबूलमध्ये पत्रकार जमाल खाशोगीला पकडण्यासाठी किंवा ठार करण्याच्या मोहिमेस मान्यता दिली होती. अमेरिकन कॉंग्रेसला (संसदेत) सादर करण्यात आलेल्या एका गुप्तचर अहवालात, असा दावा करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन
वॉशिंग्टन
author img

By

Published : Feb 27, 2021, 10:01 PM IST

वॉशिंग्टन - सौदी अरेबियाच्या शहजादे (प्रिन्स) मोहम्मद बिन सलमानने इस्तंबूलमध्ये पत्रकार जमाल खाशोगीला पकडण्यासाठी किंवा ठार करण्याच्या मोहिमेस मान्यता दिली होती. अमेरिकन कॉंग्रेसला (संसदेत) सादर करण्यात आलेल्या एका गुप्तचर अहवालात, असा दावा करण्यात आला आहे.

हत्येसंदर्भात हा अहवाल बायडेन प्रशासनाने जाहीर केला आहे. खाशोगीची 2 ऑक्टोबर 2018 रोजी तुर्कीच्या इस्तंबूल शहरातील सौदी अरेबियाच्या दूतावासात मोहम्मद बिन सलमानच्या लोकांनी हत्या केली होती. ते अमेरिकेचे कायदेशीर स्थायी रहिवासी होते आणि 'वॉशिंग्टन पोस्ट' वृत्तपत्रात ते लेख लिहीत असत. शहजादे यांच्या धोरणांवर त्यांनी कडक टीका केली होती. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून टाकले आणि त्यांचा मृतदेहही सापडला नव्हता. खाशोगी चुकून मारला गेला हे सौदी अरेबियाला शेवटी मान्य करावे लागले आणि शहजादेंचा या हत्येतील सहभाग नाकारला गेला.

कॉंग्रेसला (संसदेत) सादर केलेल्या अहवालात नॅशनल डायरेक्टरेट ऑफ इंटेलिजेंस ऑफिसने (ओडीएनआय) म्हटले आहे की, मोहम्मद बिन सलमानने असे वातावरण तयार केले असावे, ज्यामध्ये त्याच्या सहकाऱ्यांना भीती वाटली की काम पूर्ण न केल्यामुळे त्यांना काढून टाकले जाईल. अहवालात असे म्हटले आहे की, शहजादे यांच्या आदेशाला त्याचे सहकारी विचारू शकतात किंवा त्यांच्या परवानगीशिवाय संवेदनशील कारवाया करता येण्याची शक्यता नाही. हा अहवाल ११ फेब्रुवारीचा आहे आणि या अहवालातील काही भाग गोपनीयतेच्या कक्षेतून वगळण्यात आला आहे, जो शुक्रवारी कॉंग्रेसला सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, "आमचा अंदाज आहे की सौदी अरेबियाचा राजकुमार मोहम्मद बिन सलमानने तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये सौदी पत्रकार खाशोगीला पकडण्यासाठी किंवा ठार करण्यासाठीच्या कारवाईला मंजुरी दिली." ओडीएनआयने म्हटले आहे की, त्याचे मूल्यांकन हा मोहम्मद बिन सलमानच्या इच्छेशिवाय सौदी अरेबियामध्ये निर्णय घेत नाही यावर आधारित आहे. या अभियानात त्यांचे मुख्य सल्लागार आणि त्यांच्या सुरक्षा पथकाच्या सदस्यांचा थेट सहभाग आहे. खाशोगी यांच्यासह परदेशात असणाऱ्या असंतुष्टांना शांत करण्यासाठी हिंसक उपाययोजना करण्यास त्याचे समर्थन होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.