संयुक्त राष्ट्र - जगभरात पसरलेल्या महामारी कोविड-19 विषयी संयुक्त राष्ट्र महासभेचे (यूएनजीए) अध्यक्ष व्हॉल्कन बोजकीर शुक्रवारी महासभेच्या 31 व्या विशेष सत्राच्या यजमानपदी असतील. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांमध्ये कोविड-19 वर मात करण्यासाठी आणि कोविड लसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एकत्र येऊन मार्ग तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे विशेष अधिवेशन घेतले जात आहे.
सिन्हुआच्या वृत्तानुसार, युएनजीएच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'जगातील 15 लाख लोकांचे मृत्यू, 6.2 कोटी रुग्ण कारणीभूत ठरलेल्या कोविड-19 वर नियंत्रण आणणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. हे इतिहासातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे सामाजिक आणि आर्थिक संकट आहे. यातून सावरणे ही आंतरराष्ट्रीय प्राथमिकता आहे.'
'कोविड -19 हे एक जागतिक संकट आहे. याने संरचनात्मक असमानता उघडकीस आणली आणि आपल्या समाजातील सर्वात असुरक्षित सदस्यांवर त्याचा परिणाम झाला. विशेष सत्रात कोविड-19ला हरवण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत. जागतिक पातळीवर यावर मात करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. या क्षणी जग जागतिक नेतृत्वासाठी संयुक्त राष्ट्रांकडे पहात आहे. ही बहुपक्षीयतेची परीक्षा आहे. मला विश्वास आहे की, ही महासभा मार्ग शोधण्यात यशस्वी होईल आणि आमच्या या सेवेमुळे लोकांच्या हाल-अपेष्टा संपतील,' असे बोजकीर म्हणाले.
हेही वाचा - इराणचा इस्रायलवर अणुवैज्ञानिकाची हत्या केल्याचा आरोप
दोन दिवसीय अधिवेशनात 100 हून अधिक सदस्य देश होणार सहभागी
या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस आणि बोजकीर यांच्या भाषणानंतर 140 हून अधिक देशांचे नेते आणि मंत्री या सत्राला संबोधित करतील. दोन दिवसीय विशेष अधिवेशनात गुरुवारी सर्वसाधारण चर्चा होईल आणि तज्ज्ञ, संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्था आणि आघाडीच्या वैज्ञानिकांशी संवाद साधला जाईल.
अधिवेशनाला संबोधित करणार्यांच्या यादीमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदा सुगा, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि युरोपियन संघाचे प्रमुख चार्ल्स मायकेल यांची नावे होती.
अदर पूनावालाही यांचेही भाषण
अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा मंत्री अॅलेक्स एगर या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित करतील. शुक्रवारी तीन कार्यक्रम ऑनलाइन होणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचे पूर्वीच मुद्रित केलेले भाषण या सत्रात 4 डिसेंबर रोजी ऐकवण्यात येणार आहे.
बायोटेकचे सहसंस्थापक उगुर साहिन आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत लस विकसित करणार्या टीमचे प्रमुख ओजेल तुर्सी आणि जीएव्हीआय (व्हॅकसिन अलायन्स) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सेठ बर्कलेही या विशेष सत्राला संबोधित करतील.
सर्व लोकांपर्यंत लस पोचवण्यावर भर दिला जाईल
संयुक्त राष्ट्र संघाचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले की, सरचिटणीस गुतारेस हे सर्व देश आणि सर्वत्र असलेल्या लोकांच्या गरजेवर लक्ष केंद्रित करतील. जेणेकरुन ही लस सर्वांपर्यंत पोहोचू शकेल.
दुजारिक म्हणाले की, ही लस जागतिक सार्वजनिक मालमत्ता मानली पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस गुतारेस यांच्या भाषणाचा हाच आधार असेल.
हेही वाचा - बायडेन-हॅरिस यांनी गुरुपर्वानिमित्त जगभरातील शीखांना दिल्या शुभेच्छा