ETV Bharat / international

'कोरोनाग्रस्तांचा आकडा का वाढला? हे मला नाही चीनला विचारा' - डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषद

वेईजीया जियांग या महिला पत्रकार मुळच्या चीन वंशांच्या असून सीबीएस वृत्तवाहिनीत काम करतात. ट्रम्प यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी प्रश्न विचारला होता.

FILE PIC
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : May 12, 2020, 1:54 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोनाच्या प्रसारास चीन जबाबदार असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केले आहे. कोरोनाचा उगमही वूहान प्रयोगशाळेत झाल्याचे ट्रम्प यांनी आरोप केला आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या परिस्थितीवरून एका चीनी-अमेरिकी वंशाच्या पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी उत्तर देण्याचे टाळत हाच प्रश्न तुम्ही चीनला का विचारत नाही, असा उलट प्रश्न केला. ट्रम्प यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदेदरम्यान ही घटना घडली.

वेईजीया जियांग या महिला पत्रकार मूळच्या चीन वंशांच्या असून सीबीएस वृत्तवाहिनीत काम करतात. ट्रम्प यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत त्या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारला की, कोरोनामुळे अमेरिकेत रुग्णसंख्या वाढत आहे. मृतांचा आकडाही वाढत असताना अमेरिका सर्वांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या घेत असल्याचे तुम्ही सांगत आहात. ही स्पर्धा कशासाठी? त्यावर ट्रम्प यांनी उत्तर दिले, हा प्रश्न तुम्ही चीनला का विचारत नाहीत. मला विचारु नका, कोरोनामुळे रुग्णसंख्या का वाढत आहे. हे चीनला विचारा, असे ट्रम्प म्हणाले.

त्यानंतर ट्रम्प दुसऱ्या प्रश्नाकडे वळले. मात्र, जियांग यांनी पुन्हा प्रतिप्रश्न करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मलाच का हा प्रश्न विचारत आहात, असे त्यांनी विचारले. त्यावर ट्रम्प यांनी काहीही उत्तर न देता पत्रकार परिषद संपली असे जाहीर केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.