वॉशिंग्टन - दिवाळीचा सण केवळ देशातच नव्हे तर जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दीपप्रज्वलन करुन दिवाळी साजरी केली आहे. याबद्दल त्यांनी टि्वटकरून माहिती दिली आहे.
-
As Diwali commences, @FLOTUS Melania and I wish those observing the Festival of Lights a blessed and happy celebration! #HappyDiwali pic.twitter.com/LGXkUzMJiI
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">As Diwali commences, @FLOTUS Melania and I wish those observing the Festival of Lights a blessed and happy celebration! #HappyDiwali pic.twitter.com/LGXkUzMJiI
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 27, 2019As Diwali commences, @FLOTUS Melania and I wish those observing the Festival of Lights a blessed and happy celebration! #HappyDiwali pic.twitter.com/LGXkUzMJiI
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 27, 2019
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे पत्नी मेलानिया यांच्यासमवेत दीप प्रज्वलन केले आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीप प्रज्वलन करुन आपलं नातं आणि संस्कृती भक्कम करण्याची आपण पार्थना करूया, ही दिवाळी आपणा सर्वांसाठी भरभरून आनंद घेऊन येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी हिंदीमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ
व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या काळात सुरू झाली आहे. त्याकाळी दिवाळी इंडिया ट्रीटी रूममध्ये साजरी होत असे. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यक्षीय काळाच्या पहिल्याच वर्षी व्हाइट हाउसच्या इस्ट रूममध्ये दीपप्रज्वलन केले होते.
हेही वाचा - इसिसविरूद्ध अमेरिकेची मोठी कारवाई, अल बगदादीचा खात्मा?